नराधम तरुणाने दिले जीवे मारण्याची धमकी
शिराढोण:
एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लॉजवर नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शिराढोण पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पोक्सो (POCSO) कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा तपशील:
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ११ नोव्हेंबर २०२४ ते २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घडली. आरोपी तरुणाने पीडितेची ओळख असलेल्या एका गावातून तिला लॉजवर नेले. तिथे तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आले. इतकेच नव्हे तर, आरोपीने पीडितेला शिवीगाळ करून मारहाण केली आणि या घटनेबाबत कोणास सांगितल्यास तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली.
पोलिस कारवाई:
सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने ६ मार्च २०२६ रोजी शिराढोण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पीडितेच्या प्रथम खबर (FIR) वरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध खालील कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे:
भारतीय न्याय संहिता (BNS): कलम ६४(२) द्व (आय) (एम), ११५(२), ३५१(२), ३५२, ३(५).
पोक्सो (POCSO) कायदा: कलम ४, ६, ८, १७.









