कळंब
तालुक्यातील येरमाळा येथील प्रसिद्ध श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेला यंदाही लाखो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने हजेरी लावली. कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना होणारा त्रास लक्षात घेऊन सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत पिण्याचे पाणी, बिस्किटे आणि ओआरएस (ओरल रिहायड्रेशन सोल्युशन) यांचे मोफत वाटप करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेला उत्साहात सुरुवात झाली असून, दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. वाढत्या उष्णतेमुळे भाविकांना होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी कंपनीने मंदिर परिसरासह आंबराई भागात पाणी बाटल्या, बिस्किटांचे पुडे आणि ओआरएसचे वितरण केले. या उपक्रमामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला असून, सेरेंटिकाच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कंपनीच्या स्वयंसेवकांनी भाविकांची तहान भागवण्याबरोबरच त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतली. यात्रेतील गर्दी, उष्णता आणि प्रवासाचा ताण लक्षात घेता अशा प्रकारचे उपक्रम भाविकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे दिसून आले. सेरेंटिकाच्या या पुढाकारामुळे यात्रेला सामाजिक सेवेची एक सकारात्मक जोड मिळाली.
यावेळी सेरेंटिका रिन्यूएबल्सचे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट सुरजीत नारायण यांनी सांगितले की, “आमचे अस्तित्व लोकांची सेवा करणे, समुदायांना बळकट करणे आणि राष्ट्रीय प्रगतीला हातभार लावणे यासाठी आहे. आम्ही उभारत असलेले प्रत्येक प्रकल्प केवळ अभियांत्रिकी कर्तृत्व नसून, तो विकास, सुलभता आणि सन्मान यांचे साधन आहे. आमचे प्रत्येक निर्णय सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊनच घेतले जातात.”
सेरेंटिका रिन्यूएबल्स हे आस्थापन धाराशिव जिल्ह्यातील वाशी, भूम आणि कळंब तालुक्यात हरित ऊर्जा निर्मितीचे महत्त्वाचे काम करत आहे. ५ बिलियन युनिट्स हरित ऊर्जा निर्मितीचे ध्येय समोर ठेवून कंपनी कार्यरत असून, प्रकल्पाच्या नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत पर्यावरण संरक्षण, समुदाय कल्याण आणि पारदर्शकतेला प्राधान्य दिले जाते.
खऱ्या अर्थाने प्रगती म्हणजे केवळ पायाभूत सुविधा उभारणे नव्हे, तर लोकांचे जीवनमान उंचावणे, समुदाय अधिक सक्षम करणे आणि शाश्वत भविष्यासाठी योगदान देणे होय, असा सेरेंटिकाचा ठाम विश्वास आहे.










