Thursday, April 16, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन    📰सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली    📰उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात    📰येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ    📰धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

शालेय पोषण आहारातील भ्रष्टाचारावरून आमदार कैलास पाटील आक्रमक; शिक्षणमंत्र्यांना सभागृहात धारेवर

लोकाभिमान by लोकाभिमान
March 17, 2026
in धाराशिव
A A
0
0
SHARES
18
VIEWS

हिरवा ऐवजी पांढरा वाटाणा; कोट्यवधींचा गैरव्यवहाराचा आरोप

धाराशिव

शालेय पोषण आहार योजनेतील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा विधानसभेत गाजला. आमदार कैलास पाटील यांनी या प्रकरणी दोषी अधिकारी व पुरवठादारांवर कडक कारवाईसह एसआयटीमार्फत चौकशीची मागणी करत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना धारेवर धरले.

यावर उत्तर देताना मंत्री भुसे यांनी सचिव पातळीवर चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

सभागृहात बोलताना आमदार पाटील म्हणाले की, पंतप्रधान शालेय पोषण आहार योजना राज्यात राबवली जात असली तरी प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत आहे. निविदेत हिरवा वाटाणा नमूद असताना वितरणावेळी पांढरा वाटाणा देण्यात आल्याचा गंभीर प्रकार त्यांनी उघड केला. हिरवा आणि पांढरा वाटाणा यामध्ये किलोमागे सुमारे 100 रुपयांचा फरक असून या माध्यमातून मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराला खतपाणी घातल्याचा आरोप त्यांनी केला.

अधिकारी आणि पुरवठादार यांच्या संगनमताने हा प्रकार झाल्याचे सांगत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला की, निविदा आणि कार्यारंभ आदेशात स्पष्टता असूनही प्रत्यक्ष पुरवठ्यात बदल कसा झाला? हिरव्या वाटाण्याच्या दराने पांढऱ्या वाटाण्याचा पुरवठा करून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

यावर मंत्री भुसे यांनी प्रकाराची दखल घेत चौकशीचे आश्वासन दिले. मात्र, यावर समाधान न मानता आमदार पाटील अधिक आक्रमक होत त्यांनी स्वतः दिलेल्या तक्रारीवर आतापर्यंत कोणती कारवाई झाली, असा सवाल उपस्थित केला. “पुरवठादार सरकारचे जावई आहेत का?” असा थेट सवाल करत त्यांनी सरकारला कोंडीत पकडले.

या प्रश्नांच्या सरबत्तीमुळे काही काळ सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती पाहून मंत्री भुसे यांनी नरमाईची भूमिका घेत प्रथम आयुक्तांमार्फत आणि त्यानंतर सचिवांमार्फत चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

या मुद्द्यावरून आमदार कैलास पाटील यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरत सखोल चौकशीसाठी भाग पाडल्याचे चित्र सभागृहात पाहायला मिळाले.

Tags: MLA Kailas Patil aggressive over corruption in school nutrition;
Previous Post

अल्पवयीन मुलाचे अपहरण; कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

Related Posts

धाराशिव

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026
धाराशिव

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026
धाराशिव

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
धाराशिव

येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ

April 4, 2026
धाराशिव

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

March 28, 2026
तंत्रज्ञान

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
Next Post

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब शहरात गुंडगिरी वाढली; हॉटेलमध्ये घुसून मारहाण, युवक गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!