कळंब :
१७ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमजत जाफर पठाण (वय ४३, रा. फरीदनगर, तांदुळवाडी रोड, डिकसळ ता. कळंब जि. धाराशिव) यांचा मुलगा आयान अमजत पठाण (वय १७) यास दि. १४ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरातून अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून पळवून नेले.
या घटनेनंतर अमजत पठाण यांनी दि. १६ मार्च २०२६ रोजी कळंब पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्या आधारे पोलिसांनी भा.न्या.सं. कलम १३७(२) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास कळंब पोलीस करीत असून, मुलाचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत करण्यात आली










