Thursday, April 16, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन    📰सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली    📰उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात    📰येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ    📰धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ

लोकाभिमान by लोकाभिमान
April 4, 2026
in धाराशिव
A A
0
0
SHARES
35
VIEWS

लाखो भाविकांकडून पारंपरिक चुना वेचण्याचा सोहळा संपन्न

कळंब
तुळजाभवानी मातेची धाकटी बहिण समजल्या जाणाऱ्या कळंब तालुक्यातील येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या यात्रेत भक्तीचा महासागर उसळला. “आई राजा उदो उदो”चा गजर, संबळाचा कडकडाट आणि आराधी गीतांच्या तालावर तब्बल १८ लाख भाविकांनी पारंपरिक पद्धतीने चुना वेचत देवीच्या चरणी माथा टेकवला.

श्री क्षेत्र येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेतील चुनखडी वेचण्याचा मुख्य कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. या पारंपरिक सोहळ्यासाठी सुमारे दहा लाख भाविक येरमाळा नगरीत दाखल झाले होते. सकाळी ८.०० वाजता देवीची विधिवत महापंचोपचार पूजा व आरती मानकरी अमोल पाटील, बच्चू पाटील व इतर मानकऱ्यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर झांज, ढोलकी आणि संबळाच्या गजरात देवीची पालखी मुख्य डोंगरावरील मंदिरातून आमराई मंदिराकडे प्रस्थान झाली.

“आई राजा उदो उदो”च्या जयघोषात भाविक संबळ, झांज व हलगीच्या तालावर तल्लीन होऊन पालखीसमोर नाचत होते. भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता पोलिस बंदोबस्तात पालखीचा प्रवास संथगतीने सुरू ठेवण्यात आला. सकाळी १०.०० वाजता पालखीने गावात प्रवेश केला. या वेळी गावकऱ्यांनी सड्यांचे शिंपण करून रांगोळ्या काढल्या आणि पालखी मार्गावर फुलांचे अंथरूण घातले.

गावातील मुख्य रस्त्यावरून पालखी जात असताना खांदेकर्‍यांच्या पायावर पाणी घालून तसेच परशुरामाच्या मूर्तीला चुरमुरे, बत्ताशे व पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी ११.०० वाजता पालखी चुनखडीच्या शेतात दाखल झाली. या वेळी भाविकांनी वेचलेले पाच खडे व नैवेद्य पालखीवर अर्पण केला. त्यानंतर दुपारी सुमारे १२.०० वाजता पालखी आमराई मंदिरात विसावली.

या वेळी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. देवस्थानचे पुजारी, मानकरी व खांदेकरी पालखी सोबत होते. तसेच आजी-माजी खासदार, आमदार व विविध राजकीय पदाधिकाऱ्यांनीही पालखीचे दर्शन घेतले.


भक्तीत भाविक तल्लीन
मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली असतानाही भाविकांचा उत्साह कमी झाला नाही. कडक उन्हातही श्री येडेश्वरी देवीच्या भक्तीत भाविक तल्लीन झाले होते.


आमराईमध्ये मुक्काम
चुना वेचण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर आई येडेश्वरीची पालखी तेरखेडा मार्गालगतच्या आमराईकडे मार्गस्थ झाली. दुपारी १२ वाजता पालखी आमराईत पोहोचली. पुढील पाच दिवस पालखीचा मुक्काम येथेच असणार असून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.


हलगीच्या ठेक्यावर नृत्य
यात्रेनिमित्त विविध भागांतून आलेल्या तृतीयपंथीयांमध्येही मोठा उत्साह दिसून आला. हलगीच्या ठेक्यावर नृत्य करत त्यांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले.

हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
येडेश्वरी देवीची पालखी आमराईत आल्यानंतर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वतीने हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

क्षणचित्रे :

कडक उन्हातही भाविकांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला.

पालखीसमोर हळद लावत फुगडी खेळणाऱ्या महिलांची लगबग.

विविध राजकीय पक्षांकडून भाविकांसाठी नाश्ता व पाण्याची सोय.

भाविकांचा दोन दिवसांपासून मुक्काम; राहुट्यांमध्ये वास्तव्य.

खाद्यपदार्थ, थंड पेयांची दुकाने आणि व्यापाऱ्यांची मोठी गर्दी.

Tags: An ocean of faith in Yermala town; Devotees' emotional outpouring while harvesting traditional lime
Previous Post

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

Next Post

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

Related Posts

धाराशिव

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026
धाराशिव

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026
धाराशिव

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
धाराशिव

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

March 28, 2026
तंत्रज्ञान

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
धाराशिव

शालेय पोषण आहारातील भ्रष्टाचारावरून आमदार कैलास पाटील आक्रमक; शिक्षणमंत्र्यांना सभागृहात धारेवर

March 17, 2026
Next Post

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब शहरात गुंडगिरी वाढली; हॉटेलमध्ये घुसून मारहाण, युवक गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!