Thursday, April 16, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन    📰सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली    📰उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात    📰येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ    📰धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

लोकाभिमान by लोकाभिमान
March 28, 2026
in धाराशिव
A A
0
0
SHARES
37
VIEWS



धाराशिव

प्रियंवदा महाडदळकर यांची धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव यांच्या स्वाक्षरीने २७ मार्च रोजी त्यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले.भारतीय प्रशासकीय सेवेत २०२२ मध्ये देशात १३ वा आणि महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या श्रीमती.महाडदळकर यांनी मुंबई येथील व्हीजेटीआय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून,त्यानंतर बेंगळुरू येथील आयआयएममधून फायनान्स विषयात एमबीए पदवी संपादन केली आहे.शैक्षणिकदृष्ट्या भक्कम पायाभूत तयारीनंतर त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत प्रशासकीय सेवेत प्रवेश केला.

प्रशासकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी जून २०२३ ते मे २०२४ या कालावधीत धाराशिव जिल्ह्यातच त्यांनी परिविक्षाधीन काळात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम करताना स्थानिक प्रशासन,ग्रामीण विकास व विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.त्यानंतर त्यांनी दिल्ली येथे अर्थ मंत्रालयात सहाय्यक सचिव म्हणून काम पाहिले.

यानंतर अमरावती जिल्ह्यातील धारणी येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी (एसडीओ) म्हणून त्यांनी कार्य करत आदिवासी व दुर्गम भागातील विकासकामांना गती दिली. स्थानिक समस्यांचे निराकरण, शासकीय योजनांचा प्रभावी लाभ आणि प्रशासनातील पारदर्शकता यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.

आता धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी श्रीमती. महाडदळकर यांची नियुक्ती झाल्याने जिल्ह्यातील ग्रामीण विकास,पायाभूत सुविधा,शिक्षण,आरोग्य आणि सामाजिक कल्याण योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीला गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Tags: Priyamvada Mahaddalkar appointed as Chief Executive Officer of Dharashiv Zilla Parishad
Previous Post

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

Next Post

येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ

Related Posts

धाराशिव

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026
धाराशिव

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026
धाराशिव

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
धाराशिव

येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ

April 4, 2026
तंत्रज्ञान

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
धाराशिव

शालेय पोषण आहारातील भ्रष्टाचारावरून आमदार कैलास पाटील आक्रमक; शिक्षणमंत्र्यांना सभागृहात धारेवर

March 17, 2026
Next Post

येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब शहरात गुंडगिरी वाढली; हॉटेलमध्ये घुसून मारहाण, युवक गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!