Sunday, April 19, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन    📰सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली    📰उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात    📰येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ    📰धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

आता चर्चा नाही, थेट कृती हवी,” 
रोडरोमियोवर कठोर कारवाई करावी,

लोकाभिमान by लोकाभिमान
March 2, 2026
in धाराशिव
A A
0
0
SHARES
100
VIEWS

नगराध्यक्षा सुनंदा शिवाजी कापसे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची घेतली भेट

कळंब
शहरात वाढत्या गुन्हेगारीने नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. शाळा आणि महाविद्यालय परिसरात रोडरोमियोचा उघड उच्छाद आणि पोलिसांची ढिलाई या सगळ्यामुळे संताप वाढत आहे.  महिलांची आणि विद्यार्थिनींची सुरक्षितता धोक्यात येत असल्याची तीव्र भावना शहरात पसरली आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा सुनंदा शिवाजी कापसे यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची भेट घेत कळंबमध्ये तातडीने निर्भया पथक स्थापन करण्याची ठाम मागणी केली. “आता चर्चा नाही, थेट कृती हवी,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. शाळा, महाविद्यालये, बसस्थानके आणि मुख्य चौकांमध्ये नियमित व तीव्र गस्त वाढवून रोडरोमियोवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

मागील काही दिवसांपासून शहरातील शाळा व महाविद्यालय परिसरात रोडरोमियोचा उच्छाद मांडला आहे. ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण घेणे अवघड झाले आहे. त्यामुळे मुलींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाली आहे. या संदर्भात नगराध्यक्षा सुनंदा कापसे यांनी पोलीस अधीक्षक रितू खोखर यांची भेट घेऊन शहरातील इतर गंभीर प्रश्नही अधोरेखित केले. अल्पवयीन मुलांच्या हातात सर्रास दुचाकी वाहने दिसत असून वाहतूक नियमांची उघडपणे पायमल्ली होत आहे. सिगारेट, सुलोचन आणि अमली पदार्थांच्या वाढत्या वापराकडे त्यांनी लक्ष वेधले. यावर तातडीने विशेष मोहीम राबवली नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशी खंत व्यक्त केली आहे.
यावेळी धाराशिवच्या नगराध्यक्षा नेहा काकडे, उपनगराध्यक्ष लखन गायकवाड, शिवसेना गटनेते अतुल कवडे, भाजपा गटनेते हर्षद अंबुरे, पाणीपुरवठा सभापती भूषण करंजकर, नगरसेविका पूजा धोकटे आदी उपस्थित होते. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एकत्र आल्यासच शहर सुरक्षित होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
 

निर्भया पथक कोठे?
दरम्यान, निर्भया पथकाची तातडीने नियुक्ती करून कठोर कारवाई झाली नाही, तर नागरिक रस्त्यावर उतरतील, अशी कुजबुज शहरात सुरू झाली आहे. कळंबमध्ये आता शब्दांपेक्षा कृतीचीच अपेक्षा आहे.

कळंबमध्ये कायद्याचा धाक हवा;
कायदा आणि सुव्यवस्था टिकवायची असेल तर पोलिस प्रशासनाने आता ठाम आणि कडक भूमिका घेणे अपरिहार्य ठरणार आहे. शहरात गुन्हेगारीला आळा बसावा, प्रत्येक चौकात कायद्याचा धाक जाणवावा आणि पालकांनीही आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पार पाडावी, यासाठी विशेष मोहीम राबवावी लागणार आहे. कळंबमधील प्रत्येक मुलगी आणि महिला सुरक्षित असणे ही केवळ अपेक्षा नाही, तर प्रशासनाची जबाबदारी आहे, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर कळंब पोलिसांनी ठोस पावले उचलून शहरात सुरक्षित वातावरण निर्माण करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

Tags: "  Strict action should be taken against Rodromeo"No more discussiondirect action is needed
Previous Post

सेरेंटिका रिन्यूएबल्स कडून २२० के.व्ही. EHV वीजवाहिनीचे यशस्वीरित्या काम पूर्ण; चार्जिंग सुरू

Next Post

कळंब पंचायत समितीवर महायुतीचा भगवा! नशिबाची साथ आणि युतीची वज्रमूठ; ‘चिठ्ठी’ने दिला महायुतीला कौल

Related Posts

धाराशिव

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026
धाराशिव

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026
धाराशिव

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
धाराशिव

येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ

April 4, 2026
धाराशिव

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

March 28, 2026
तंत्रज्ञान

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
Next Post

कळंब पंचायत समितीवर महायुतीचा भगवा! नशिबाची साथ आणि युतीची वज्रमूठ; 'चिठ्ठी'ने दिला महायुतीला कौल

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब शहरात गुंडगिरी वाढली; हॉटेलमध्ये घुसून मारहाण, युवक गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!