Sunday, April 19, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन    📰सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली    📰उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात    📰येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ    📰धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

बँकांची रजाकारशाही सुरूच, शेतकऱ्यांचा संताप उफाळला..

लोकाभिमान by लोकाभिमान
October 1, 2025
in धाराशिव
A A
0
0
SHARES
527
VIEWS

सरकार झोपलंय का?

कळंब:
अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेला शेतकरी आपला संसार सावरत असताना, दुसरीकडे बँका जबरदस्तीने कर्जवसुलीचा दंडुका उगारत आहेत, जिल्हाधिकारी यांच्या स्पष्ट आदेशानंतरही काही बँका त्या आदेशांना धाब्यावर बसवत, शेतकऱ्यांवर वसुलीचा तगादा लावत आहेत. हे फक्त आदेशांचं उल्लंघन नाही, तर शेतकऱ्यांच्या विश्वासावरचा मोठा घात आहे,

जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी सर्व बँकांना आदेश दिले होते की, शेतकऱ्यांना कर्जवसुलीबाबत कोणतीही नवीन नोटीस देऊ नये. जिल्हा अग्रणी बँकेमार्फत हा आदेश सर्व बँकांपर्यंत पोहोचवण्यात आला होता. मात्र कळंब तालुक्यातील संजीतपूर येथील शेतकऱ्यांना येरमाळा शाखेतील एका बँकेने कर्जवसुलीच्या नोटिसा पाठवल्या आहेत. यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला बँकेने थेट हरताळ फासल्याचे चित्र समोर आले आहे. शासनाचे आदेश एकीकडे आणि बँकांची मनमानी दुसरीकडे शेतकरी नेमकं कुणावर विश्वास ठेवावा? असा सवाल आता शेतकऱ्यांकडून केला जात आहे. अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करावे, हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.


रजाकारशाही सुरूच….
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचे आदेश असताना सुध्दा कर्ज वसुली करीता शेतकऱ्यांना नोटीस पाठवण्याचे चालु आहे. अतीवृष्टी च्या नुकसानीच्या शेतकऱ्यांच्या जखमा अजूनही सुकलेल्या नाहीत. शेती उद्ध्वस्त झाली, जनावरे वाहून गेली, संसार उध्वस्त झाला आणि अशा परिस्थितीत बँकांनी कर्ज फेडण्यासाठी नोटीस पाठवल्या आहेत


नोटिसांची होळी चा इशारा…
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी थेट इशारा दिला आहे की, जर बँकांनी त्वरित कर्जवसुली थांबवली नाही, तर या बेकायदेशीर नोटिसांची होळी करण्यात येईल. शासन गप्प, बँका बेधडक आणि शेतकरी मात्र कर्जाच्या जाळ्यात अडकलेला आहे. हे थांबायलाच हवं, प्रशासन जर बँकांवर नियंत्रण ठेवू शकत नसेल, तर अशा प्रशासनाचा उपयोग काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.


बँकांची दादागिरी थांबवा…
हे सरकार शेतकऱ्यांचं आहे की बँक माफियांचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटिसा पाठवून, कर्ज फेडण्याचा दबाव टाकला जातोय. आम्ही शांत आहोत म्हणजे कमजोर नाही. आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नका,अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

Tags: Banks' severance continuesfarmers' anger erupts.
Previous Post

पुरग्रस्त भागातील उच्च व वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे – आमदार कैलास पाटील

Next Post

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या बँक नोटिसांची होळी

Related Posts

धाराशिव

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026
धाराशिव

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026
धाराशिव

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
धाराशिव

येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ

April 4, 2026
धाराशिव

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

March 28, 2026
तंत्रज्ञान

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
Next Post

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या बँक नोटिसांची होळी

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब शहरात गुंडगिरी वाढली; हॉटेलमध्ये घुसून मारहाण, युवक गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!