Sunday, April 19, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन    📰सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली    📰उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात    📰येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ    📰धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

नळदुर्गची दिशा नागरी पतसंस्था लुटणारे आरोपी ४८ तासांत जेरबंद; १.४९ किलोपेक्षा अधिक दागिने जप्त

लोकाभिमान by लोकाभिमान
November 17, 2025
in क्राईम, धाराशिव
A A
0
0
SHARES
108
VIEWS

नळदुर्ग
येथील दिशा नागरी पतसंस्थेमधून ४ किलो ७६३ ग्रॅम सोने आणि २ लाख २१ हजार रुपये असा एकूण २ कोटी ६३ लाख ६३ हजार २७२ रुपयांचा मुद्देमाल ८ नोव्हेंबर २०२५ रोजी चोरीस गेला होता. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि विनोद इज्जपवार यांच्याकडे सोपवण्यात आला होता. तपासादरम्यान तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पतसंस्थेत कार्यरत असलेला लिपीक राहुल राजेंद्र जाधव यानेच साथीदारांच्या मदतीने चोरी केली असल्याचे समोर आले. त्याला ताब्यात घेतल्यावर इतर साथीदारांची नावेही उघड झाली. चोरीचा मुद्देमाल त्यांच्याकडे असल्याचीही माहिती मिळाली.

पुण्यातून तीन आरोपी अटक
आरोपी हे पूर्वीपासून दरोडा, जबरी चोरी आणि इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे तपासात स्पष्ट झाले. आरोपी सतत ठिकाणे बदलत असल्याने त्यांचा शोध घेणे कठीण होते. तरीही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राहुल राजेंद्र जाधव(नळदुर्ग), सुशिल संजय राठोड (नळदुर्ग), संजय अमृत जाधव (लाडवंतीवाडी, कर्नाटक) शिलरत्न महादेव गायकवाड (औराद ता. उमरगा) तीन आरोपींना पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी पकडले.  चौकशीत आरोपींनी मुद्देमाल शेतातील विहिरीत लपवून ठेवल्याचे सांगितले. पथकाने तेथून १ किलो ४९२ ग्रॅम ७०० मिली वजनाचे, अंदाजे १ कोटी ७५ हजार ७२५ रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले. सर्व आरोपींना न्यायालयात हजर करून पोलिस कोठडी मिळवली आहे. त्यांच्याकडून इतर साथीदार आणि उर्वरित मुद्देमालासंदर्भात अधिक तपास सुरू आहे.

सुरक्षा ऑडिट करण्याचे आवाहन
पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व सहकारी पतसंस्थांना सुरक्षा ऑडिट करण्याचे आणि आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

कामगिरी करणारे पथक
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्री निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि विनोद इज्जपवार, सपोनि सुनील कासार, सपोनि नंदकिशोर सोळंके आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

Tags: Accused of robbing Naldurg's Disha Nagari Credit Society arrested within 48 hours; More than 1.49 kg of jewelry seized
Previous Post

कळंब निवडणुकीत रंगत शिगेला; राष्ट्रवादी शरद पवार गटाचा निर्णय अद्यापही रहस्यमय

Next Post

कळंबमध्ये धाडसी चोरी… बियरच्या 78 बॉक्ससह चोरटे फरार

Related Posts

धाराशिव

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026
धाराशिव

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026
धाराशिव

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
धाराशिव

येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ

April 4, 2026
धाराशिव

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

March 28, 2026
तंत्रज्ञान

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
Next Post

कळंबमध्ये धाडसी चोरी… बियरच्या 78 बॉक्ससह चोरटे फरार

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब शहरात गुंडगिरी वाढली; हॉटेलमध्ये घुसून मारहाण, युवक गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!