Sunday, April 19, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन    📰सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली    📰उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात    📰येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ    📰धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

कळंबमध्ये मोठा उलटफेर? नगराध्यक्षपदी सुनंदा कापसे, राजकीय गणिते बदलली

लोकाभिमान by लोकाभिमान
December 22, 2025
in धाराशिव
A A
0
0
SHARES
715
VIEWS

कळंब

महायुतीला महत्त्वपूर्ण यश मिळाले असून शिवसेनेच्या सुनंदा शिवाजी कापसे यांनी २२५४ मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. या विजयामुळे कळंबच्या राजकारणात महायुतीचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडी आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांमध्ये थेट व तिरंगी लढत झाली. प्रचारकाळात आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले होते. मात्र मतदानाच्या दिवशी मतदारांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत आपली भूमिका स्पष्ट केली. यंदा ७२३१ महिला व ८००३ पुरुष अशा एकूण १५,२३४ मतदारांनी मतदान केले असून मागील निवडणुकीच्या तुलनेत १२१९ मतांची वाढ झाली आहे. ही वाढीव मते निर्णायक ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
   दि. २१ डिसेंबर रोजी संत गोराबा काका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे तीन फेऱ्यांत मतमोजणी झाली. पहिल्या फेरीपासूनच महायुतीने आघाडी घेतली आणि ती अखेरपर्यंत कायम राखली. शिवसेनेच्या सुनंदा कापसे यांनी ७६८९ मते मिळवत स्पष्ट आघाडी घेतली. महाविकास आघाडीच्या रश्मी संजय मुंदडा यांना ५४३५ मते, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रा. मिनाक्षी श्रीधर भरव यांना १८६० मते मिळाली. अखेरीस २२५४ मतांच्या फरकाने महायुतीचा विजय निश्चित झाला.
नगरसेवक पदाच्या निकालातही चित्र समसमान राहिले. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांना प्रत्येकी दहा जागा मिळाल्या असून नगर पालिकेत बळकटीची राजकीय लढत पुढील काळातही कायम राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. महायुतीतील भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांनी महत्त्वाच्या प्रभागांमध्ये विजय मिळवत संघटनात्मक ताकद दाखवून दिली, तर महाविकास आघाडीनेही शहरी मतदारांमध्ये आपली पकड कायम असल्याचे सिद्ध केले आहे.


महायुती मधील भाजपच्या योजना अनंत वाघमारे १५५ मतांनी, शितल चोंदे ६०, लखन गायकवाड १२७, हर्षद अंबुरे ८ मते, भुषण करंजकर ४७०, शीला शिवा पवार १०१ मतांनी विजयी झाले आहेत. शिवसेनेचे रोहण पारख २९१ मते, अमर चाऊस ५१२ मते, पुजा धोकटे ८४ मते, अतुल कवडे १४३ मतांनी विजयी झाले आहेत.


महाविकास आघाडी मधील उबाठा गटाचे ज्योती हारकर १०९ मते, जमील कुरेशी १०८ मते, इंदुमती हौसलमल २०४ मते, अशा सुधीर भवर ११२ मते, सागर मुंडे १७१ मते, सफुरा काझी ९७ मते, मोसीन मिर्झा ६३ मते, वनमाला शंकर वाघमारे १७, रुक्शाना बागवान ६२ मते कॉग्रेस अर्चना प्रताप मोरे २१० मतांनी विजयी झाले आहेत.

Tags: Sunanda Kapse has been elected as the mayor.
Previous Post

पवनउर्जा प्रकल्पासंदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार

Next Post

खडकीजवळ भीषण अपघात, सात ऊसतोड मजूर जखमी

Related Posts

धाराशिव

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026
धाराशिव

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026
धाराशिव

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
धाराशिव

येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ

April 4, 2026
धाराशिव

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

March 28, 2026
तंत्रज्ञान

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
Next Post

खडकीजवळ भीषण अपघात, सात ऊसतोड मजूर जखमी

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब शहरात गुंडगिरी वाढली; हॉटेलमध्ये घुसून मारहाण, युवक गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!