Sunday, April 19, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन    📰सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली    📰उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात    📰येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ    📰धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

लाचखोरी प्रकरणात लोहारा पोलिस ठाण्यातील चौघे निलंबित

लोकाभिमान by लोकाभिमान
November 13, 2025
in क्राईम, धाराशिव
A A
0
0
SHARES
6
VIEWS

धाराशिव –

लोहारा येथील सहआरोपी न करण्याच्या मोबदल्यात एका शेतकऱ्याकडून तब्बल पाच लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकलेल्या लोहारा पोलिस ठाण्यातील चौघा पोलिसांना अखेर निलंबित करण्यात आले आहे.

तक्रारदाराच्या मित्राविरुद्ध लोहारा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्याला सहआरोपी न करण्यासाठी पोलिसांनी पाच लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराकडे तातडीने रक्कम उपलब्ध नसल्याने त्याने तात्पुरते दहा तोळे सोन्याचे कडे आरोपींना दिले. दरम्यान, तक्रारदाराच्या भावाकडून चार लाख रुपये घेतल्यानंतरही आरोपींनी आणखी पाच लाख रुपयांची मागणी सुरूच ठेवली होती.

एसीबी पुणे विभागाने 6, 7 आणि 10 नोव्हेंबर रोजी पडताळणी कारवाई केली. तपासात पोलीस शिपाई आकाश भोसले आणि निवृत्त एएसआय बळीराम बोळके यांनी सोन्याचे कडे स्वतःकडे ठेवून घेतल्याचे मान्य केले. तसेच प्रभारी अधिकारी एपीआय ज्ञानेश्वर कुकलारे यांनी तक्रारदाराच्या भावाकडून तीन लाख रुपये घेतल्याचे आणि उर्वरित दोन लाख रुपये भोसले किंवा तिघाडे यांच्याकडे देण्यास सांगितल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी चौघा आरोपी पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत.

निलंबितांमध्ये लोहारा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भिमराज कुकलारे, सहाय्यक फौजदार निवृत्त बळीराम बोळके, पोलिस अमलदार आकाश मधुकर भोसले आणि पोलिस नाईक अर्जुन शिवाजी तिघाडे यांचा समावेश आहे.

या कारवाईमुळे धाराशिव पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

Tags: Four people from Lohara police station suspended in bribery case
Previous Post

खामसवाडीत लांडग्याचा कहर – शेतकऱ्यांच्या शेळीचा फडशा, परिसरात भीतीचं सावट

Next Post

उमेदवार ठरत नाहीत; कळंबमध्ये तिसऱ्या आघाडीची चर्चा जोरात

Related Posts

धाराशिव

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026
धाराशिव

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026
धाराशिव

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
धाराशिव

येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ

April 4, 2026
धाराशिव

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

March 28, 2026
तंत्रज्ञान

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
Next Post

उमेदवार ठरत नाहीत; कळंबमध्ये तिसऱ्या आघाडीची चर्चा जोरात

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब शहरात गुंडगिरी वाढली; हॉटेलमध्ये घुसून मारहाण, युवक गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!