Sunday, April 19, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन    📰सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली    📰उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात    📰येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ    📰धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

“उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

लोकाभिमान by लोकाभिमान
November 29, 2025
in धाराशिव
A A
0
0
SHARES
934
VIEWS

कळंब
उन्हात आईला विजयी करण्यासाठी घराघरात फिरणारी एक लेक. हातात प्रचारपत्रक आणि मनात फक्त एकच इच्छा, “आईसाठी लोकांपर्यंत पोहोचायचं.” थकवा, उन्हाची तीव्रता किंवा प्रचारातील कष्ट याची तिला चिंता नाही. तिचा साधा संवाद आणि मनापासून केलेला आग्रह पाहून अनेकांच्या भावना दाटून येतात. दार उघडणारे लोकही क्षणभर थांबून तिच्या निष्ठेकडे पाहतात.


कळंब नगरपालिकेच्या निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापत आहे. उमेदवार घराघरात जात मतदारांशी संवाद साधत आहेत. प्रत्येक प्रभागात चुरशीची लढत दिसते आहे. घोषणांचा गोंगाट, समर्थकांची धावपळ आणि सततचे राजकीय गणित यामुळे शहरात निवडणुकीची धडपड वाढली आहे. पण या सगळ्यात प्रभाग क्रमांक सहामधील एक प्रसंग सगळ्यांच्या मनाला वेगळाच स्पर्श करून जातो.
महाविकास आघाडी कडून प्रभाग क्रमांक सहा मध्ये पांडूरंग कुंभार व अर्चना प्रताप मोरे या कॉग्रेस (आय) कडून निवडणूक लढवत आहे. यामध्ये आता अर्चना प्रताप मोरे यांच्या प्रचाराच्या गदारोळातही लेक प्रतिक्षा कडुन आई – लेकीच्या या नात्याचे दर्शन मतदारांच्या मनात एक खास जागा निर्माण करत आहे. निवडणुकीतील स्पर्धा, आरोप-प्रत्यारोप, रणनीती या सगळ्यांमध्ये ही भावना वेगळीच उभी राहते. राजकीय उष्णतेतही या प्रयत्नात एक सच्चेपणा दिसतो. कळंबच्या धावपळीत हा छोटासा पण हृदयाला स्पर्श करणारा क्षण लोकांना निवडणुकीकडे एका वेगळ्या नजरेने पाहायला भाग पाडतो.

हे आहे भावनिक पत्र

माहेरची लेक….
पत्रास कारण की…
सर्वांना साष्टांग नमस्कार…. मी आपली लेक अर्चना प्रताप मोरे (जाधव), मला विसरून तर गेला नाही ना..
माझ्या लहानपणीची प्रत्येक आठवण तुमच्याशी जोडलेली आहे. तुमच्या अंगा खांद्यावर खेळुन मी मोठी झाले आहे, तुम्हीच माझा हात धरुन मला पहिले पाऊल टाकायची हिम्मत दिली होती. मला अजुनही तुम्ही माझ्यावर केलेले प्रेम व विश्वास आयुष्यभर आठवणी मध्ये राहणार आहे, माझी कायम नाळ तुमच्याशी जोडलेली आहे. मी कधीही माझ्या माहेरी आले की, आपल्या सर्वांच्या कुटुंबातील सदस्य आपुलकीने बोलतात, या प्रेमामुळे आपले ऋणानुबंध कायम आयुष्यभर टिकणार आहेत.
ज्या रस्त्यावर धावत मी लहानाची मोठी झाले, ती आठवण अजुनही माझ्या डोळ्यासमोर तरळते, मात्र आता त्याच रस्त्याची अवस्था आता पाहवत नाही, माझ्या माहेरच्या प्रभागातील नाल्यांची सफाई व इतर कामे झालेली नाही, विकास तर कोसोदुर आहे, त्यामुळे आता कोणीतरी या करीता पुढे यावे लागेल हा विचार करुन आपला आशिर्वाद पाठिशी घेऊन माझ्या माहेरातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये कॉग्रेस (आय) निवडणुकीसाठी उभी राहिली आहे. मी फक्त निवडुन येण्यासाठी नाही तर, माझे माहेर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी व तुमच्या स्वप्नातील प्रभागा मधील विकासाच्या पायाभरणी साठी निवडणूकीत उभी राहिली आहे, मी तुमची लेक आहे, तुम्ही आम्हाला ज्या प्रमाणे प्रेम दिले त्याच प्रमाणे साथ द्या..
तुम्ही लेकीला आशिर्वादरुपी मतदानाची साथ देणार हा मला विश्वास आहे.

Tags: A daughter running from house to house for her mother in the sun...
Previous Post

पवन ऊर्जा प्रकल्पात खंडणी,मारहाणीचीथेट तक्रार करा, कारवाई करू – एस.पी. रितू खोखर

Next Post

कळंबमध्ये ट्रॅक्टर–जेसीबी घोटाळा उघड; दोन ठगांकडून 1 कोटी 22 लाखांची फसवणूक

Related Posts

धाराशिव

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026
धाराशिव

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026
धाराशिव

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
धाराशिव

येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ

April 4, 2026
धाराशिव

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

March 28, 2026
तंत्रज्ञान

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
Next Post

कळंबमध्ये ट्रॅक्टर–जेसीबी घोटाळा उघड; दोन ठगांकडून 1 कोटी 22 लाखांची फसवणूक

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब शहरात गुंडगिरी वाढली; हॉटेलमध्ये घुसून मारहाण, युवक गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!