Sunday, April 19, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन    📰सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली    📰उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात    📰येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ    📰धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीतर्फे ‘नेशन बिल्डर पुरस्काराचे’ थाटात वितरण; सात शिक्षकांचा गौरव

लोकाभिमान by लोकाभिमान
October 18, 2025
in धाराशिव
A A
0
0
SHARES
106
VIEWS



कळंब
शिक्षकांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीतर्फे वनेशन बिल्डर अवॉर्ड वितरण सोहळा अत्यंत उत्साहात आणि थाटात पार पडला.

कळंब येथील जयभवानी मंगल कार्यालयात आयोजित या सोहळ्यात डीजीई जयेश पटेल (अध्यक्ष), रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. डॉ. अभिजित जाधवर, सचिव रो. शाम जाधवर यांची प्रमुख उपस्थिती होती शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सात आदर्श शिक्षकांचा ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ देऊन सन्मान करण्यात आला. या उपक्रमातून शिक्षक हेच राष्ट्रनिर्माते हा महत्त्वपूर्ण संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला.
डिस्ट्रिक्ट डीजीई जयेश पटेल यांनी यावेळी मार्गदर्शन करताना शिक्षकांना देशाचे खरे आधारस्तंभ संबोधले. रोटरीच्या कार्याची माहिती देताना ते म्हणाले, रोटरी क्लबने काही वर्षांपूर्वी पोलिओ निर्मूलनाचा वसा घेऊन काम केले आणि आज संपूर्ण जग पोलिओमुक्त झाले आहे. त्याच धर्तीवर, रोटरी क्लबने आता साक्षरता अभियान राबवण्याचा संकल्प केला आहे.
या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन म्हणून सुशील तीर्थकर, संजय घुले आणि श्रीकांत कळंबकर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन सुशील तीर्थकर आणि संजय घुले यांनी केले, तर रोटरी सचिव शाम जाधवर यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा महत्त्वपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी रोटरीचे सर्व सदस्य आणि कळंबमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिक्षकांचा सन्मान
शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे रमेशकुमार दादासाहेब काकडे, शिवाजी भगवान बांगर नंदा पांडुरंग घुटे, उत्रेश्वर चंदर शिंदे, विजय नारायण जायभाय, गीताक्षी गोविंदराव नागटिळक, बालाजी पांडुरंग जाधवर या सर्व शिक्षकांना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह  पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

उत्कृष्ट गणेश मंडळांचाही गौरव
कळंब शहरातील उत्कृष्ट गणेश देखावा पारितोषिकांचेही वाटप करण्यात आले. यामध्ये लोकमान्य गणेश मंडळ, श्रीशिवशंकर गणेश मंडळ आणि व्यंकटेश गणेश मंडळ यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

Tags: Rotary Club of Kalamb City distributes 'Nation Builder Award' in a grand manner; Seven teachers honored
Previous Post

मूक-बधिर विद्यार्थ्यांनी उजळले ‘मनाचे आकाश’; कळंबमध्ये कंदिलांनी दिला ‘स्वाभिमानाचा आवाज

Next Post

सप्टेंबर मधील अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या जमीनी व फळबांगांना पंचनाम्यानुसार नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा आमदार . कैलास पाटील यांची मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे

Related Posts

धाराशिव

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026
धाराशिव

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026
धाराशिव

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
धाराशिव

येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ

April 4, 2026
धाराशिव

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

March 28, 2026
तंत्रज्ञान

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
Next Post

सप्टेंबर मधील अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या जमीनी व फळबांगांना पंचनाम्यानुसार नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा आमदार . कैलास पाटील यांची मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब शहरात गुंडगिरी वाढली; हॉटेलमध्ये घुसून मारहाण, युवक गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!