धाराशिव
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवानेते आदित्य ठाकरे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांपासून ते तरुण नेतृत्वापर्यंत अनेक दिग्गजांचा समावेश आहे.
धाराशिव जिल्ह्यातील खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावरही पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. राज्यभरात शिवसेनेचा प्रचार तेजीत नेण्याची भूमिका त्यांना दिली गेली आहे.
या यादीत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, संजय राऊत, अनंत गीते, चंद्रकांत खैरे, अरविंद सावंत, भास्कर जाधव, अनिल देसाई, विनायक राऊत, अनिल परब, राजन विचारे, सुनील प्रभू, आंदेश बांदेकर, वरूण सरदेसाई, अंबादास दानवे, रवींद्र मिर्लेकर, विशाखा राऊत, नितीन बानगुडे पाटील, राजकुमार बाफना, प्रियांका चतुर्वेदी, सचिन अहिर, मनोज जामसुतकर, सुषमा अंधारे, संजय (बंडू) जाधव, किशोरी पेडणेकर, ज्योती ठाकरे, शीतल शेठ देवरूखकर, जान्हवी सावंत, शरद कोळी, ओमराजे निंबाळकर, सुनील शिंदे, वैभव नाईक, नितीन देशमुख, आनंद दुबे, किरण माने, अशोक तिवारी, प्रियांका जोशी, सचिन साठे आणि लक्ष्मण वाडले यांचा समावेश आहे.
शिवसेनेच्या प्रचार मोहिमेत आता हे स्टार प्रचारक राज्यभर पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवणार आहेत










