Thursday, April 16, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन    📰सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली    📰उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात    📰येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ    📰धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

कळंब शहरात गुंडगिरी वाढली; हॉटेलमध्ये घुसून मारहाण, युवक गंभीर जखमी

लोकाभिमान by लोकाभिमान
March 14, 2026
in क्राईम, धाराशिव
A A
0
0
SHARES
893
VIEWS

कायदा व सुव्यवस्था प्रश्न गंभीर

कळंब : शहरात मागील काही दिवसांपासून गुंडगिरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसा ढवळ्या काही जणांनी शहरातील एका हॉटेलमध्ये घुसून दहशत माजवत कर्मचाऱ्यांना मारहाण केली. तसेच जेवणासाठी आलेल्या एका युवकावर वजनदार वस्तूने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दिनांक  १४ मार्च रोजी शहरातील हॉटेल प्रेरणा येथे सुमारे आठ ते दहा जणांचे टोळके अचानक आले. त्यांनी वेटर व इतर कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली तसेच हॉटेलमध्ये तोडफोड केली. यावेळी जेवणासाठी आलेले सुमीत मोदी या युवकाच्या डोक्यात वजनदार वस्तू मारल्याने तो गंभीर जखमी झाला. जखमी मोदी यांना पुढील उपचारासाठी धाराशिव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे वाद मिटल्यावरही हेच टोळके पुन्हा हॉटेलमध्ये परत येऊन शिवीगाळ करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या घटनेप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली नाही.

दरम्यान, कळंब शहरात मागील काही वर्षांपासून शांत असलेले वातावरण पुन्हा अस्थिर होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. मागील महिन्यात शहरातील मुख्य चौकात पोलिसांसमोरच हाणामारी झाली होती. त्यानंतर चार दिवसांपूर्वी एका विशिष्ट समाजातील दोन गटांमध्ये मोठा वाद झाला होता. त्या दोन्ही गटांनी दोन दिवस शहरात दहशत माजवली होती. त्या घटनेतही गुन्हा दाखल झाला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

चौकट : नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना

मागील काही दिवसांपासून कळंब शहरात वारंवार हाणामारीच्या घटना घडत आहेत. मात्र या प्रकरणांमध्ये गुन्हेगारांविरोधात अद्याप कठोर कारवाई होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी वाढत असून सामान्य नागरिक स्वतःला असुरक्षित समजू लागले आहेत.

चौकट : पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

भर चौकात भांडणासारख्या घटना घडत असतानाही अनेक वेळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन गुन्हेगारांना पाठिशी घालत आहे का, असा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Tags: Hooliganism increased in Kalamb city; Youth seriously injured after entering hotel and being beaten up
Previous Post

कळंबमध्ये पूरक पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ; तीन जलकुंभ उभारले जाणार

Next Post

जिल्हा परिषदेचे ६७ विद्यार्थी इस्रो सहलीसाठी रवाना

Related Posts

धाराशिव

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026
धाराशिव

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026
धाराशिव

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
धाराशिव

येरमाळा नगरीत श्रद्धेचा सागर; पारंपरिक चुना वेचताना भक्तांचा भावनिक ओघ

April 4, 2026
धाराशिव

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

March 28, 2026
तंत्रज्ञान

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
Next Post

जिल्हा परिषदेचे ६७ विद्यार्थी इस्रो सहलीसाठी रवाना

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब शहरात गुंडगिरी वाढली; हॉटेलमध्ये घुसून मारहाण, युवक गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0

पाथर्डी येथे साऊ समितीची बैठक; एकल महिलांना योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शन

April 6, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा स्तुत्य उपक्रम; येडेश्वरी यात्रेत भाविकांची तहान भागवली

April 5, 2026

उन्हातही थांबली नाही भक्ती… शिवसेनेने येरमाळा यात्रेत अन्नदानाने दिला मायेचा हात

April 3, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!