कळंब (प्रतिनिधी )
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन, शिवसेना पक्षप्रमुख . श्री. उद्धवजी ठाकरे तसेच शिवसेना नेते युवासेना प्रमुख मा. श्री. आदित्यजी ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून, खासदार ओमराजे निंबाळकरआ कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इटकूर ता कळंब येथील अभयसिंह दत्तात्रय आडसुळ,अजितसिंह प्रतापराव पाटील,रोहित आबासाहेब आडसुळ,ओम श्रीनीवास गंभीरे,उमेश दत्तात्रय आडसुळ,अजयसिंह विलासराव पाटील,सचिन सर्जेराव आडसुळ,खंडेराव हनुमंतराव गंभीरे,बळीराजे गंभीरे,जयदेव गंभिरे,नवनाथ आडसुळ,गोकुळ फरताडे आदी युवकांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला .
यावेळी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न आपण सोडवाल आणि हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहचवून शिवसेना संघटना बळकट कराल,असा विश्वास व्यक्त केले.
ईटकुर ता कळंब येथील मराठा आंदोलनाच्या चळवळीतील अग्रगण्य नेत्रत्व अभियसिंह राजे आडसुळ यांचे मराठा आंदोलनातील चळवळीती मोठे योगदान आहे पुणे, मुंबई याठिकाणी झालेल्या मराठा क्रांती मोर्चात ते सक्रिय होते त्यांच्या शिवसेना प्रवेशाने शिवसेनेला बळ मिळणार आहे .