कळंब
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सेनेच्या धाराशीव जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन कळंब येथे करण्यात आले होते. यावेळी रिपब्लिकन सेना ही शिवसेने सोबत स्थानिक निवडणुक लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
मराठवाडा उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी कपिलजी सरोदे आणि महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्रा. डॉ. युवराज धसवाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकांसाठी शिवसेना रिपब्लिकन सेना युतीची घोषणा करण्यात आली. संघटन वाढीवर लक्ष आणि युतीची रणनीती बाबत या बैठकीत संघटनेच्या मजबुतीकरणावर विशेष भर देण्यात आला. पक्षाचे नेते मुजीब भाई पठाण, जिल्हाध्यक्ष अनिल हजारे, फुलचंद गायकवाड आणि गौतम बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
केवळ निवडणुकीत भाग घेणे हा उद्देश नाही, तर शेवटच्या कार्यकर्त्याला सत्ता मिळाली पाहिजे.’ यासाठी युती मोठ्या ताकदीने लढणार असून, विजयासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात येणार आहे. असे सर्वांनी भाषणात स्पष्ट केले.
या आढावा बैठकीला सुरज वाघमारे, सतपाल बचुटे, राकेश कोमटवार, थोरात सरपंच, मुकेश गायकवाड, शक्ती भैय्या गायकवाड, सोनू कांबळे, राहूल गाडे, अजय माने, शरद सायस हजारे, सुरेश तांबारे, पवन हजारे, पृथ्वीरत्न गाडे, बाबासाहेब कांबळे, आप्पासाहेब हजारे, दत्ता हिंगे आदि उपस्थित होते.
राजकीय गणिते..
वंचित आणि तरुणांना न्याय मिळवून देणार
रिपब्लिकन सेना सामाजिक न्यायाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सर्व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील तरुणांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संघटन प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा प्रभारी कपिलजी सरोदे आणि महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्रा. डॉ. युवराज धसवाडीकर यांनी नमूद केले.
राजकीय गणिते
जिल्हाध्यक्ष अनिल हजारे यांनी अनेक गावात रिपब्लिकन सेनेची फळी उभारली आहे, याचा फायदा आगमी निवडणूक मध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही, रिपब्लिकन सेनेने शिवसेने सोबत च्या युतीची घोषणा केली, भविष्यात राजकीय गणिते कशी मांडली जातात हे पुढील काळात समजणार











