धाराशिव 
धाराशिव जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती पदांसाठीची आरक्षण सोडत दि. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडणार आहे. या सोडतीकडे सर्व राजकीय पक्षांचे नेते आणि इच्छुक सदस्यांचे लक्ष लागले आहे.
जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता कै. यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद कार्यालयात पार पडणार आहे. महाराष्ट्र जिला परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ नुसार ही सोडत घेतली जाणार आहे.
सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही गटांत यानिमित्ताने रणनीतीची चुरस सुरू झाली असून, कोणत्या समितीत कोणत्या पक्षाला अनुकूल आरक्षण मिळते याकडे राजकीय वर्तुळांचे बारकाईने लक्ष आहे.
सोडतीचा निकाल जाहीर होताच अनेक ठिकाणी पुढील निवडणूक समीकरणांवर थेट परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
			










