उमरगा
तालुक्यातील कुन्हाळी गावात केवळ दहा रुपयाच्या फाटक्या नोटेवरून वाद निर्माण होऊन चाकूने हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
उमरगा तालुक्यातील कुन्हाळी गावातील मारुती मंदिराजवळील सुरेश कुकर्डे यांच्यासोबत फाटकी दहा रुपयांची नोट बदलून देण्याच्या कारणावरून झालेल्या या वादात  लिंबराज कुकर्डे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली आणि चाकूने गंभीर जखमी केले. हल्ल्यात लिंबराज यांच्या पत्नी, मुलगा आणि मुलगी यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही शिवीगाळ करून मारहाण केली तसेच जीव घेण्याची धमकी दिली.
   या प्रकरणात उमरगा पोलिसांनी विष्णु ज्ञानेश्वर कुकर्डे, बळीराम ज्ञानेश्वर कुकर्डे, ज्ञानेश्वर काशीराम कुकर्डे आणि सुरेश काशीराम कुकर्डे (सर्व रा. कुन्हाळी, ता. उमरगा) या चौघांविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
			










