Tuesday, November 4, 2025
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰संत शिरोमणी मन्मथ स्वामी मंदिरासाठी सागवानी सिंहासन अर्पण    📰कळंब नगर पालिका निवडणूक: भाजपचा ‘कमळ’ ठाम, महायुतीत तणावाची चाहूल    📰“महामार्गावरचा थरार संपला: धाराशिव पोलिसांचा ‘ऑपरेशन जॅक’ यशस्वी!”    📰कळंब नगर पालिकेच्या मतदार याद्यांतील गोंधळ अखेर संपला.    📰फक्त काही दिवसांत मोठा पराक्रम! धाराशिव पोलिसांनी उघडकीस आणली 2 कोटींची चोरी उघडकीस, विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचा पोलिसांना गौरव    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Nana Patole : मलिदा कोणत्या खात्यात जास्त मिळतोय याच्यावर महायुतीच्या नेत्यांची ओढताण; नाना पटोले यांचा घणाघात

लोकाभिमान by लोकाभिमान
November 30, 2024
in राजकारण
A A
0
0
SHARES
13
VIEWS

Nana Patole: राज्यातले हे जनतेच्या मतानं निवडून आलेलं सरकार नाही. यांना जनतेची काळजी नाही. मलिदा कोणत्या खात्यात जास्त मिळतोय याच्यावर या तिघांचं सध्या ओढताण सुरू आहे. अशी टीका नाना पटोले यांनी केलीय.

Nana Patole भंडारा : राज्यातले हे जनतेच्या मतानं निवडून आलेलं सरकार नाही. यांना जनतेची काळजी नाही. मलिदा कोणत्या खात्यात जास्त मिळतोय याच्यावर या तिघांचं सध्या ओढताण सुरू आहे. महाराष्ट्रात अजूनही धान खरेदी झालीय त्याचे पैसे दिलेले नाही. धान खरेदी केंद्र, सोयाबीन, कापसाचे सेंटर सुरू झालेले नाहीत. शेतकर्‍याची आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत. बेरोजगारांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत. महागाई पुन्हा झपाट्यानं वाढायला लागलेली आहे. बाकी यांना जनतेशी लेणंदेणं नाही.

जनतेची भीती त्यांच्या मनातून गेलेली आहे आणि निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं हे पाप लपवत आहे. निवडणुकीत स्पष्टता आली नाही. त्यामुळे हे जनतेचं सरकार आहे की, नाही हाच संशय प्रत्येकाच्या मनात असल्याचा टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. सत्ता स्थापनेसाठी बहुमत मिळालेल्या भाजप सरकार अद्यापही सरकार स्थापन करीत नाही, तर शिंदे हे गृहमंत्री पदासाठी अडून बसले असल्याने त्यांच्यावर ही टीका नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते निवडणूक निकालानंतर ते पहिल्यांदाच भंडाऱ्यात आले असताना माध्यमांशी बोलताना त्यांनी, मुख्य निवडणूक आयोग, महायुतीचे नेते, आणि महायुतीच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आमदारांसह आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीबाबतही वक्तव्य केलं.

निवडणूक आयोगालाचं व्यवस्थित करायचंय

पुढच्या निवडणुकांना अजून वेळ आहे, त्याच्यापेक्षा जे काही आता निवडणुकांमध्ये गोंधळ निवडणूक आयोगाकडून झाला तो विषय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राच्या जनतेचं हीत आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे पुढच्या निवडणुकीची चर्चा आज करण्यापेक्षा निवडणूक आयोगालाचं व्यवस्थित कसं करता येईल आणि लोकांच्या हक्काचे संरक्षण कसं करता येईल, हा प्रश्न काँग्रेससाठी महत्त्वाचा असल्याची वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. आगामी काळात महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र निवडणुका लढतील का या विषयावर नाना पटोले बोलत होते.

70 लाख मतदान रात्रीच्या अंधारात झालंय

झालेल्या मतदानाची स्पष्टता निवडणूक आयोग का देत नाही? याबाबत काँग्रेसनं आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. रात्री उशिरापर्यंत कुठं मतदान झालं, त्याची सीसीटीव्ही फुटेजेस का देत नाहीत. 70 लाख मतदान रात्रीच्या अंधारात झालेलं आहे. याच्या स्पष्ट ते बाबत मुख्य निवडणूक आयोग यांना आम्ही मेमोरेंडम नव्हे तर कायदेशीर नोटीस आम्ही दिलेलं आहे. निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्टता दिली नाही तर, आम्ही उच्च न्यायालयात जाऊ, सुप्रीम कोर्टात जाऊ. माननीय सुप्रीम कोर्ट ही ऐकला नाही तर, रस्त्यावरची लढाई लढायचा निर्णय आम्ही केलेला आहे. काही उमेदवारांना टेक्निकल बाबी लक्षात आल्या असल्यास त्यांनी अर्ज केलेला असावा. पवार साहेबांना त्याबाबतची काही माहिती मिळाली असेल त्या पुराव्याच्या आधारावर ते बोलत असतील, अशी खोचक ठेवा टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगावर केली आहे.

महिला अत्याचाराचे गुन्हे असलेल्यांना भाजपनं उमेदवारी देवून आमदार केलं

आकडेवारीवरून गुन्हेगारी स्वरूपाचे आमदारात भाजपात नंबर एक वर आहे. पार्टी विथ दी डिफरन्स. अशी जी कहानी भाजप नेहमी बनवायची, हा पार्टी विथ डिफरन्स आहे. महिला अत्याचाराच्या जास्तीत जास्त उमेदवारांना तिकीट देऊन आमदार करण्याचं काम त्या लोकांनी (भाजपनं) केलं. त्यामुळं त्यांचा असली चेहरा जो आहे, तो यानिमित्तानं स्पष्ट झालाय की, गुंडाईजम हाच भाजपाचा मूळ पाया आहे. गुंडाईजमच्या आधारावर सत्ता घ्यायची आणि भ्रष्टाचार करायचा आणि राज्य लुटायचं, देश लुटायचं ही परंपरा भाजपनं केली आहे. हा त्याचाचं प्रत्यय आहे.

भाजपच्या आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहे हा त्याचाच प्रत्यय असल्याचा घराघाती आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे राज्यातील 288 आमदारांपैकी 187 आमदारांवर गंभीर गुण स्वरूपाचे गुन्हे असून 118 आमदारांवर महिला अत्याचार खून आणि भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल आहे यावर नाना पटोले बोलत होते.

Tags: Nana patole
Previous Post

शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा तेवत ठेवणारा महामेरू.

Next Post

धाराशिवमध्ये मराठा समाज आक्रमक; संतोष देशमुख खून प्रकरणी आरोपींना अटक करण्याची मागणी

Related Posts

धाराशिव

स्थगिती देणार फडणवीस सरकार आणि दोष आमच्यावर? चोराच्या उलट्या बोंबा – तानाजी जाधवर

October 29, 2025
धाराशिव

कळंब नगर पालिका निवडणुकीत रिपाईचा स्वबळाचा नारा

October 12, 2025
राजकारण

कळंब नगरपालिकेतील मतदार याद्यांवर घोटाळ्याचा वास, बनावट मतदारांची एंट्री

October 12, 2025
राजकारण

कळंब नगर पालिका निवडणुकीत रिपाइची निर्णायक भूमिका?

October 11, 2025
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वबळाचा बिगुल; कळंबच्या राजकारणात चुरस वाढली

October 11, 2025
राजकारण

सत्तेचा गड घरातच! कळंब नगराध्यक्षपदासाठी नेत्यांच्या सौभाग्यवतींमध्ये रस्सीखेच

October 10, 2025
Next Post

धाराशिवमध्ये मराठा समाज आक्रमक; संतोष देशमुख खून प्रकरणी आरोपींना अटक करण्याची मागणी

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना (शिंदे गट) सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब नगरसेवक आरक्षण जाहीर; दिग्गजांचे गणित बिघडले, नव्या चेहऱ्यांना संधी!

    0 shares
    Share 0 Tweet 0

संत शिरोमणी मन्मथ स्वामी मंदिरासाठी सागवानी सिंहासन अर्पण

November 2, 2025

कळंब नगर पालिका निवडणूक: भाजपचा ‘कमळ’ ठाम, महायुतीत तणावाची चाहूल

November 1, 2025

“महामार्गावरचा थरार संपला: धाराशिव पोलिसांचा ‘ऑपरेशन जॅक’ यशस्वी!”

November 1, 2025
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!