कळंब 
प्रसिद्ध कथाकार आणि ग्रामीण साहित्य चळवळीतील महत्त्वपूर्ण साक्षीदार प्रा. भास्कर चंदनशीव (वय ८० वर्ष) यांचे लातूर येथील रुग्णालयात निधन झाले. 
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात आणि बीड येथील बलभीम महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून दीर्घकाळ सेवा केली. निवृत्तीनंतर ते आपल्या गावी कळंब येथे स्थायिक झाले.
  जांभळढव्ह, मरणकळा, अंगारमाती,नवी वारुळ, बिरडं, लालचिखल; ललितलेख संग्रह : रानसई ; समीक्षा ग्रंथ : भूमी आणि भूमिका, माती आणि नाती, माती आणि मंथन; संपादन : ज्योती म्हणे, गाथा, सगनभाऊंच्या लावण्या आदि पुस्तक प्रकाशित झाले आहेत. म. ज्योतीराव फुले यांच्या शेतीविषयक विचारांच्या प्रभावातून मांडले आहेत. लाल चिखल’ ही कथा विद्यापीठ, इयत्ता दहावी व बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये होती. 
    दलितमित्र पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङमयनिर्मिती पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार, बी.रघुनाथ पुरस्कार, पु.भा.भावे पुरस्कार, अ.वा.वर्टी पुरस्कार, दिवाकर कृष्ण पुरस्कार, आनंदीबाई शिर्के पुरस्कार आणि दमाणी पुरस्कार इत्यादी महत्वाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. उपपरिसर धाराशिव येथे विद्यापीठाच्या २१व्या वर्धापनदिनानिमित्त १६ ऑगस्ट २०२५ रोजी नुकताच त्यांना ‘जीवनसाधना’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मराठवाडा साहित्य परिषद धाराशिव शाखेचे ते मार्गदर्शक होते. अस्मितादर्श साहित्य संमेलन, मराठवाडा साहित्य संमेलन, ग्रामीण साहित्य संमेलन इत्यादीचे ते अध्यक्ष होते.
प्रा. भास्कर चंदनशीव (वय ८० वर्ष) यांचे लातूर येथे उपचारादरम्यान रुग्णालयात निधन झाले. कळंब शहरातील स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत..
			






