कळंब:- महाविकास आघाडीचे उमेदवार आ कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे स्टार प्रचारक खा ओमराजे निंबाळकर उमेदवार कैलास पाटील यांनी सभा बैठका दवारे प्रचारात आघाडी घेतली आहे . आगामी विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात व्युवरचना आखण्यासाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्याच्या भव्य मेळाव्याचे आयोजन गुरुवारी दुपारी 2 वाजता मोहा रोडवरील बलाई मंगल कार्यालयात कळंब येथे करण्यात आले आहे .
या मेळाव्यात शिवसेनेचे स्टार प्रचारक खा ओमराजे निंबाळकर उमेदवार कैलास पाटील हे पदाधिकारी कार्यकर्त्याचे म्हणणे ऐकुण घेऊन त्यांना आगामी विधासभेच्या प्रचाराची रणनीती ठरवत मार्गदर्शन करणार असल्याने सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्त्यानी उपस्थीत राहण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे .