पक्षीय तिकिटांवरच चित्र स्पष्ट होणार.
लोकाभिमान विशेष
कळंब नगर पालिका निवडणुकीत नगरसेवक पदासाठी तब्बल ४९ जणांनी ५९ नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत. अंतिम किती उमेदवार स्पर्धेत उतरणार, हे काही दिवसांत स्पष्ट होईल. काही विभागांत बंडखोरांना उमेदवारी मिळते का नाही, यावर नागरिकांचे लक्ष आहे.
शहरात सकाळचा गारवा असला तरी निवडणुकीचे वातावरण तापले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांच्या उमेदवारीवर अजूनही संभ्रम आहे. अनेक इच्छुकांनी पक्षाकडून तिकीट मिळेल की नाही, याची चिंता ठेवत पक्षीय आणि अपक्ष अशा दोन्ही मार्गाने नामनिर्देशन दाखल केले आहे. पक्षाचा एबी फॉर्म जाहीर झाल्यानंतरच खरे चित्र उघडेल.
नगरसेवक पदासाठी ४९ जणांकडून ५९ नामनिर्देशन पत्रे
माजी नगराध्यक्ष पांडूरंग कुंभार, माजी नगरसेविका योजना वाघमारे, अनिता लोमटे, सरला अजय सरवदे, माजी नगरसेवक मुस्ताक खुरेशी, अतुल कवडे, गजानन चोंदे, रोहन पारख, अर्चना प्रताप मोरे, सागर मुंडे, हर्षद अंबुरे यांसह अनेकांच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष आहे. त्याचबरोबर स्वाती दत्तात्रय कदम, नितीन वाडे, शितलचंद्र चोंदे, कविता चोंदे, ज्योती दिपक हारकर, आशाबाई पौळ, आरेफ तांबोळी, दानिश खुरेशी, जमील कासिम खाटीक, सुनंदा गायकवाड, विनोद समुद्रे, संगिता घुले, सुशीलकुमार तिर्थकर, अर्चना बावीस्कर, दिपमाला हुरगट, शोभा ठाकूर, सारिका वाघ, पूजा धोकटे, योगेश अंधारे, अमरबीन चाऊस, सतपाल बनसोडे, प्रती हौसलमल, राजेश्वरी टोपे, दिक्षा वाघमारे, अनिस शेख, शशिकांत निरफळ, नाजमीन बागवान, शाला पवार, रेश्मा पवार, अॅड. मंदार मुळीक, कुणाल करंजकर, अनिल करंजकर, गोरक्ष करंजकर, भुषण करंजकर, सुदीपकुमार देवकर, संजय बनसोडे यांनीही उमेदवारी दाखल केली आहे.पक्षांचे एबी फॉर्म मिळाल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.
नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल
या पदासाठी पाच जणींनी नामनिर्देशन दाखल केले असून यात सुनंदा कापसे, माजी नगराध्यक्षा मिराबाई चोंदे, धनश्री कवडे, ज्योती सपाटे आणि शेहनाज शेख यांचा समावेश आहे. पक्षीय तिकीट मिळाल्यानंतर अंतिम स्पर्धा स्पष्ट होईल. या मध्ये शिवसेना कडून दोन, राष्ट्रवादी काँग्रेस कडुन एक, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडुन एक, पीआरपी व अपक्ष कडून प्रत्येकी एक असे एकूण पाच नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहे. पक्षांचे एबी फॉर्म मिळाल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.
विविध पक्षाच्या नावाने नामनिर्देशन पत्र दाखल
शिवसेना (शिंदे गट) – १५
भाजप – १६
शिवसेना (उद्धव गट) – १०
काँग्रेस – ३
पीआरपी – १
अपक्ष – १३
एकूण नामनिर्देशनपत्रे – ५९










