परिसरातील कथाकार, कवी यांना खास निमंत्रित करण्यात आले असून काव्य संमेलनाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी समाज विकास संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद पांचाळ, संपादिका अमिता पैठणकर,कवी महादेव गपाट,अश्रुबा कोठावळे, एडवोकेट दिलीप कांबळे,प्रो. मनीषा कदम (खोबरे) यांचीही उपस्थिती लाभणार आहे.

याशिवाय धनंजय घोगरे, प्राचार्य जगदीश गवळी,केव्ही सरवदे, शेखर गिरी,ओमप्रकाश गिरी, समाजसेविका अनिता तोडकर,मनीषा घुले, शिवमती विजया वाघ, विलास मुळीक,महवीर डोके,सोबत, महाराष्ट्र लोकविकास मंचाचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य उत्तरदायित्व या स्वयंसेवी नेटवर्कचे पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती आणि येण्यासाठी आव्हान भूमिपुत्र वाघ यांनी केले आहे.
