१० प्रभागात २० नगरसेवक असणार;
कळंब:
कळंब नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी बहुप्रतिक्षित नवीन प्रभाग रचनेला अखेर अंतिम मान्यता मिळाली आहे. नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन आणि विभागीय आयुक्त यांच्या मंजुरीनंतर ही रचना जाहीर झाली आहे.
     या कळंब नगर पालिका कायम चर्चेत राहणारी नगर पालिका आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत नगर पालिकेत आठ प्रभागातून १७ नगरसेवक व जनतेतून एक नगराध्यक्ष निवडून आले होते. त्यानंतर सन २०२२ मध्ये नवीन प्रभाग रचना करण्यात आली होती. त्यावेळी दोन प्रभाग आणि तीन नगरसेवकांची जागा वाढवण्यात आली होती. त्यानुसार शहरातील १० प्रभागांत २० नगरसेवक असणार आहेत.
  तीन वर्षांनंतर नगर पालिकेच्या निवडणुकीचे बिगुल पुन्हा वाजले असून यावेळी काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक प्रभागातून दोन सदस्य निवडले जाणार आहेत. प्रत्येक प्रभागाची लोकसंख्या २२०० ते २८०० च्या दरम्यान निश्चित करण्यात आली आहे.
     
२०२२ ची रचना कायम:
२०२२ मध्ये करण्यात आलेली प्रभाग रचनाच यावेळी कायम ठेवण्यात आली आहे. १८ सप्टेंबर रोजी ही प्रारूप रचना प्रसिद्ध झाल्यानंतर हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी कळंब नगरपालिकेच्या प्रभाग रचना प्रस्तावास अंतिम मान्यता दिली आहे.
प्रारुप प्रभाग रचना
प्रभाग क्रमांक १ (लोकसंख्या २३३८)
दक्षिणमुखी हनुमान मंदिर, खंडोबा मंदिर, श्री स्वामी समर्थ सेवा
प्रभाग क्रमांक २ (लोकसंख्या २५८५)
कसबा पेठ, गणपती मंदिर, पोस्ट ऑफिस
प्रभाग क्रमांक ३ (लोकसंख्या २६५६)
भीमनगर, साठेनगर, नगर परिषद कार्यालय, पशुवैद्यकीय रुग्णालय
प्रभाग क्रमांक ४ (लोकसंख्या २५२८)
बुद्धविहार, कळंब बसस्थानक, ग्रामीण रुग्णालय
प्रभाग क्रमांक ५ (लोकसंख्या २८००)
गांधीनगर, सावरगाव हनुमान मंदिर, विद्या भवन हायस्कूल
प्रभाग क्रमांक ६ (लोकसंख्या २३८४)
मार्केट यार्ड, रामेश्वर मंदिर
प्रभाग क्रमांक ७ (लोकसंख्या २३३१)
कल्पना नगर, बाबा नगर, बलाई मंगल कार्यालय
प्रभाग क्रमांक ८ (लोकसंख्या २७९८)
इंदिरा नगर, देवी मंदिर, नगर पालिका गार्डन
प्रभाग क्रमांक ९ (लोकसंख्या २७३४)
इंदिरा नगर, शिवाजी नगर, आयेशा मस्जिद, तहसीलदार कार्यालय
प्रभाग क्रमांक १० (लोकसंख्या २५५९)
दत्त नगर, तहसील कार्यालय, मोहेकर कॉलेज, पोलीस स्टेशन
			










