धाराशिव पोलिसांचा उपक्रम
धाराशिव –
पोलिस आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक मजबूत करण्यासाठी धाराशिव जिल्हा पोलिसांनी एक अभिनव पाऊल उचलले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक रितु खोखर यांच्या संकल्पनेतून सुरक्षादूत चॅटबॉट ही व्हॉट्सअॅप सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे नागरिकांना पोलिसांच्या विविध सुविधा मोबाईलवरूनच सहज मिळू शकतील.
या उपक्रमाचे उद्घाटन विशेष पोलिस महानिरीक्षक विरेंद्र मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आले. नागरिकांनी आपल्या मोबाईलमधून 7796422525 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप संदेश पाठवून “सुरक्षादूत” सेवांचा वापर करावा. कोणतीही तक्रार, माहिती, सूचना किंवा मदत हवी असल्यास पोलिस विभागाशी थेट संवाद साधता येणार आहे.
या चॅटबॉटच्या माध्यमातून धाराशिव पोलिस दल अधिक तंत्रज्ञानाभिमुख आणि जनतेजवळ पोहोचणारे बनले आहे. नागरिकांनी या उपक्रमाचा सक्रिय वापर करून आपल्या सुरक्षेत आणि समाजाच्या हितासाठी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी केले आहे.
व्हॉट्सअॅप चॅटबॉटद्वारे एकूण ८ महत्वाच्या सेवा उपलब्ध
गुन्हा नोंदविणे (सिटिझन पोर्टल)
वाहतूक सेवा
महिला व बाल सुरक्षा
सायबर गुन्हे तक्रार नोंदणी
जनजागृती व सामाजिक उपक्रमांची माहिती
भाडेकरूंची नोंद
सरकारी सेवा आणि अभिप्राय नोंद
पोलिसांशी थेट संपर्क सुविधा










