कळंब (प्रतिनिधी )
शहरातील विद्याभवन हायस्कूल येथील वर्ष १९९८ – ९९ च्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा पार पडला असून तब्बल २५ वर्षानंतर या मित्र – मैत्रीनींची एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
शहरातील विद्याभवन हायस्कूल येथील १९९८-९९ च्या १० वी च्या बॅच च्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याची कळंब येथे रियुनीयन या ग्रुप कडून एक महिन्यापासून तयारी चालू होती. या मेळाव्यामध्ये ७० पेक्षा जास्त या बॅचचे विद्यार्थी व विद्यार्थींनी सहभागी झाले होते. या वर्गमित्रासह शालेय जीवनातील आठवणीत रमले होते. शाळेतील आठवण म्हणून शाळेची घंटा, राष्ट्रगीत, प्रार्थना, हजेरी घेण्यात आली होती.
तब्बल २५ वर्षांनी भेटलेले हे विद्यार्थी आता विविध क्षेत्रात कार्य करीत आहेत. शालेय
जीवनाच्या बाल आठवणी तसेच आठवणीना यानिमित्ताने उजाळा मिळाला आहे. आपल्या गावाप्रती व शाळेप्रती असणारी ओढ या स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून दिसुन आली आहे. कधी अबोध शालेय जीवन जगणारे दहावीपर्यंतचे हे विद्यार्थी व विद्यार्थींनीं स्वतहाच्या आयुष्यात रसमान झालेले आहेत. अशांनी शालेय बाल मित्रांची भेट घेऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी सुत्रसंचलन प्रसिध्दी कवियात्री माया मुळे यांनी केले आहे.
चौकट
ज्ञान दिले, जीवनासाठी दिशा दाखवली या १० गुरुजनांना कृतज्ञता पत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांकडून आपले जीवन घडवणाऱ्या शाळेस आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे भेट देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे.
चौकट
कार्यक्रमाचे ठिकाण, कार्यक्रम पत्रिका, निमंत्रण पत्रिका, स्नेहभोजन, स्वागतासाठी बॅनर यासाठी कार्य करणारे व परिश्रम करणारे वर्गमित्र यांचे योगदान मोलाचे ठरले आहे. हे सर्व माजी विद्यार्थी वर्गमित्र परत एकदा आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे. गुरुजनांचा सहवास त्यांच्याशी संवाद व विद्यालया प्रति ऋण व्यक्त करणारा हा सोहळा अविस्मरणीय असा ठरला आहे.