Monday, November 3, 2025
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰संत शिरोमणी मन्मथ स्वामी मंदिरासाठी सागवानी सिंहासन अर्पण    📰कळंब नगर पालिका निवडणूक: भाजपचा ‘कमळ’ ठाम, महायुतीत तणावाची चाहूल    📰“महामार्गावरचा थरार संपला: धाराशिव पोलिसांचा ‘ऑपरेशन जॅक’ यशस्वी!”    📰कळंब नगर पालिकेच्या मतदार याद्यांतील गोंधळ अखेर संपला.    📰फक्त काही दिवसांत मोठा पराक्रम! धाराशिव पोलिसांनी उघडकीस आणली 2 कोटींची चोरी उघडकीस, विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचा पोलिसांना गौरव    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गासाठी ३२९५ कोटींच्या सुधारित आराखड्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

लोकाभिमान by लोकाभिमान
October 28, 2025
in धाराशिव, महाराष्ट्र
A A
0
0
SHARES
14
VIEWS

धाराशिवला जंक्शनचा दर्जा; अर्थकारणाला मिळणार नवी गती

धाराशिव :
धाराशिव-तुळजापूर-सोलापूर या रेल्वेमार्गासाठी तब्बल ३२९५ कोटी रुपये खर्चाचा सुधारित आराखडा राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे. त्यामुळे धाराशिवला जंक्शन रेल्वे स्थानकाचा दर्जा मिळणार असून, या प्रकल्पामुळे प्रदेशाच्या अर्थकारणाला नवसंजीवनी मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढीव खर्चानुसार निधीची तरतूद करण्याची मागणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली होती. रेल्वे बोर्डाने ५० टक्के निधी मंजूर केल्यानंतर उर्वरित हिस्सा राज्य सरकार उचलणार आहे. पूर्वी मंजूर झालेला प्रकल्प ९०४ कोटी ९२ लाखांचा होता. मात्र विविध कारणांमुळे तो रखडला आणि प्रकल्प खर्चात तब्बल ११७ टक्क्यांची वाढ झाली.  मागील अडीच वर्षापासून काम थांबले होते. आता महायुती सरकारने वाढीव १००० कोटींचा राज्य वाटा मंजूर केल्याने प्रकल्पाला गती मिळणार आहे.


तिप्पट मोठे होणार धाराशिव स्थानक
धाराशिव रेल्वे स्थानकाची इमारत ४ हजार चौरस मीटरवरून १२ हजार ६३० चौरस मीटर इतकी विस्तारित होणार आहे. प्रवासी आणि कर्मचारी यांच्यासाठी अत्याधुनिक सोयी-सुविधा उभारल्या जातील. रस्त्यांच्या वरून आणि खालून जाणाऱ्या पुलांची संख्या २० वरून ३१ करण्यात आली आहे.
  सोलापूर-धुळे महामार्गावरील मुख्य पूल ३८५ मीटरवरून ३९९ मीटर इतका वाढविण्यात येईल. जलदगती रेल्वेसाठी स्वतंत्र ट्रॅक आणि लूप लाईनची सोय केली जाईल. पथमार्ग, दादरा, प्लॅटफॉर्मसह भूमिगत पाणीटाक्या आणि नवीन निवासस्थानांचा समावेश आराखड्यात आहे.


तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र राष्ट्रीय नकाशावर

या प्रकल्पामुळे महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र तुळजापूर राष्ट्रीय रेल्वे नकाशावर झळकणार आहे. तुळजापूर – सोलापूर दरम्यानचा रेल्वेमार्गही आता गती घेईल. सुधारित आराखड्यामुळे फक्त रेल्वेसेवा सुधारेल असे नाही, तर धाराशिव, तुळजापूर आणि सोलापूर या तिन्ही शहरांच्या आर्थिक व औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

Tags: State Cabinet approves revised plan worth Rs 3295 crore for Dharashiv-Tuljapur-Solapur railway line
Previous Post

चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

Next Post

स्थगिती देणार फडणवीस सरकार आणि दोष आमच्यावर? चोराच्या उलट्या बोंबा – तानाजी जाधवर

Related Posts

धाराशिव

संत शिरोमणी मन्मथ स्वामी मंदिरासाठी सागवानी सिंहासन अर्पण

November 2, 2025
धाराशिव

कळंब नगर पालिका निवडणूक: भाजपचा ‘कमळ’ ठाम, महायुतीत तणावाची चाहूल

November 1, 2025
क्राईम

“महामार्गावरचा थरार संपला: धाराशिव पोलिसांचा ‘ऑपरेशन जॅक’ यशस्वी!”

November 1, 2025
धाराशिव

कळंब नगर पालिकेच्या मतदार याद्यांतील गोंधळ अखेर संपला.

October 31, 2025
क्राईम

फक्त काही दिवसांत मोठा पराक्रम! धाराशिव पोलिसांनी उघडकीस आणली 2 कोटींची चोरी उघडकीस, विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचा पोलिसांना गौरव

October 30, 2025
धाराशिव

शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या आंदोलनाला कळंब तालुक्यातून पाठींबा

October 30, 2025
Next Post

स्थगिती देणार फडणवीस सरकार आणि दोष आमच्यावर? चोराच्या उलट्या बोंबा – तानाजी जाधवर

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना (शिंदे गट) सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब नगरसेवक आरक्षण जाहीर; दिग्गजांचे गणित बिघडले, नव्या चेहऱ्यांना संधी!

    0 shares
    Share 0 Tweet 0

संत शिरोमणी मन्मथ स्वामी मंदिरासाठी सागवानी सिंहासन अर्पण

November 2, 2025

कळंब नगर पालिका निवडणूक: भाजपचा ‘कमळ’ ठाम, महायुतीत तणावाची चाहूल

November 1, 2025

“महामार्गावरचा थरार संपला: धाराशिव पोलिसांचा ‘ऑपरेशन जॅक’ यशस्वी!”

November 1, 2025
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!