Tuesday, November 4, 2025
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰संत शिरोमणी मन्मथ स्वामी मंदिरासाठी सागवानी सिंहासन अर्पण    📰कळंब नगर पालिका निवडणूक: भाजपचा ‘कमळ’ ठाम, महायुतीत तणावाची चाहूल    📰“महामार्गावरचा थरार संपला: धाराशिव पोलिसांचा ‘ऑपरेशन जॅक’ यशस्वी!”    📰कळंब नगर पालिकेच्या मतदार याद्यांतील गोंधळ अखेर संपला.    📰फक्त काही दिवसांत मोठा पराक्रम! धाराशिव पोलिसांनी उघडकीस आणली 2 कोटींची चोरी उघडकीस, विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचा पोलिसांना गौरव    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

चोराखळी येथे पोषण अभियानाचा विविध उपक्रमांसह उत्साहात समारोप

लोकाभिमान by लोकाभिमान
October 15, 2025
in आरोग्य
A A
0
0
SHARES
5
VIEWS

कळंब :
एकात्मिक बाल विकास सेवा योजना ग्रामीण प्रकल्प कळंब अंतर्गत येरमाळा विभागातील चोराखळी येथील मारुती मंदिरात पोषण अभियानाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. स्थानिक पौष्टिक अन्नधान्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
    येरमाळा विभागातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी यावेळी स्थानिक पातळीवर उपलब्ध अन्नधान्यांपासून तयार केलेल्या विविध पोषक पाककृतींचे भव्य प्रदर्शन भरवले. महिलांना पोषणाचे महत्त्व सहजपणे समजावे यासाठी आकर्षक सजावट आणि धान्यापासून सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.
   कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चोराखळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सीमा सोनटक्के यांनी भूषवले. विभागाच्या पर्यवेक्षिका अनुपमा बोरफळकर यांनी उपस्थित माता आणि महिलांना ‘पोषण अभियान’ आणि ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.
   कार्यक्रमादरम्यान रानभाज्या, फळे आणि फुलांची आकर्षक मांडणी करण्यात आली, तसेच सेवा प्रवेशोत्सव, किशोरी मार्गदर्शन, आणि गरोदर व स्तनदा मातांसाठी पोषण विषयक सत्रांचे आयोजन करण्यात आले. लहान मुलांनी विविध वेशभूषा सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी कार्यकर्ती पद्मश्री मैदाड यांनी केले, तर मनीषा सोनटक्के यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दैवाशाला बोधले, बबिता रणदिवे, स्वाती डोंगरे आणि रेश्मा डोंगरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

गरोदर मातांसाठी विशेष उपक्रम:
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतर्फे प्रथमच गरोदर झालेल्या मातेला बेबी केअर किट प्रदान करण्यात आले. तसेच, गरोदर मातांसाठी योग्य आणि संतुलित आहाराचे महत्त्व दाखवणारी ताट रांगोळी साकारण्यात आली होती. विशेष म्हणजे, कडधान्यांचे पोषणातील महत्त्व अधोरेखित करण्यासाठी कडधान्यांपासून गणपतीची सुरेख रचना करण्यात आली होती.

Tags: Nutrition campaign concludes with enthusiasm with various activities at Chorakhli
Previous Post


आपत्तीग्रस्त कळंब तालुक्यात ‘लोकजागर’ने आणली मदतीची उजळा किरणं

Next Post

चिमुकल्या हातांची दिवाळी भेट: आढाळा शाळेतील विद्यार्थ्यांचे शुभेच्छापत्र जाणार थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात..

Related Posts

आरोग्य

२४ कोटींची कॅथ लॅब ६७ लाखांसाठी अडकली डीपीडीसी स्थगिती तात्काळ उठवा: आमदार कैलास पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना सणसणीत इशारा

October 3, 2025
Next Post

चिमुकल्या हातांची दिवाळी भेट: आढाळा शाळेतील विद्यार्थ्यांचे शुभेच्छापत्र जाणार थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात..

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना (शिंदे गट) सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब नगरसेवक आरक्षण जाहीर; दिग्गजांचे गणित बिघडले, नव्या चेहऱ्यांना संधी!

    0 shares
    Share 0 Tweet 0

संत शिरोमणी मन्मथ स्वामी मंदिरासाठी सागवानी सिंहासन अर्पण

November 2, 2025

कळंब नगर पालिका निवडणूक: भाजपचा ‘कमळ’ ठाम, महायुतीत तणावाची चाहूल

November 1, 2025

“महामार्गावरचा थरार संपला: धाराशिव पोलिसांचा ‘ऑपरेशन जॅक’ यशस्वी!”

November 1, 2025
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!