Monday, March 2, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰आता चर्चा नाही, थेट कृती हवी,” 
रोडरोमियोवर कठोर कारवाई करावी,
   📰सेरेंटिका रिन्यूएबल्स कडून २२० के.व्ही. EHV वीजवाहिनीचे यशस्वीरित्या काम पूर्ण; चार्जिंग सुरू    📰आदेश फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा, जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून राजकीय वॉर, सोशल मीडियावर रणधुमाळी    📰कळंब तालुक्यात अफू लागवड उघड, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

   📰आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

हायवेवर दरोड्याचा डाव उधळला; सात सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून बेड्या ठोकून गजाआड

लोकाभिमान by लोकाभिमान
January 4, 2026
in क्राईम, धाराशिव
A A
0
0
SHARES
37
VIEWS

  कळंब | प्रतिनिधी
हायवेवरून जाणाऱ्या निष्पाप वाहनचालकांच्या जीवावर उठण्याचा कट स्थानिक गुन्हे शाखेने वेळीच उधळून लावला. दरोड्याच्या तयारीत असलेले सात सराईत आरोपी रात्रगस्तीत रंगेहाथ सापडताच पोलिसांनी थेट कारवाई करत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
कळंब ते केज रस्त्यावरील द्वारकानगरीजवळील बंद पेट्रोल पंप परिसरात दोन पिकअप वाहने थांबवून आरोपी दरोड्याची आखणी करत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सतर्क झाले. पोलीस वाहन दिसताच आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकातील अंमलदारांनी क्षणाचाही विलंब न करता पाठलाग करून सर्वांना जागेवरच पकडले.
ताब्यात घेतल्यानंतर आरोपींनी सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र कडक चौकशीसमोर त्यांचा बनाव टिकला नाही. चंदर भास्कर काळे, सुभाष उर्फ हरी भारकर काळे, शामसुंदर विभीषण काळे, नवनाथ अनिल शिंदे, राहुल अनिल शिंदे, बालाजी माणिक काळे व दत्ता हिरा पवार अशी आरोपींची नावे असून हे सर्व वेगवेगळ्या ठिकाणचे सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपींकडून लोखंडी धारदार तलवार, स्टीलचा रॉड, चार मोबाईल फोन तसेच दोन पिकअप वाहने असा तब्बल 10 लाख 89 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी हायवेवर वाहन अडवून जबरी लुटमार करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले.
आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची तपासणी केली असता त्यांच्यावर दरोडा, जबरी चोरी, वाहन चोरीसह गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले. त्यामुळे हे टोळके पुन्हा एकदा मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
या प्रकरणी पोलीस ठाणे कळंब येथे गुन्हा रजिस्टर नंबर 04/2026 अन्वये बीएनएस कलम 310(4), 310(5) तसेच शस्त्र अधिनियम कलम 4 व 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहायक पोलीस निरीक्षक सचिन खटक, पोलीस अंमलदार विनोद जानराव, नितीन जाधव, बबन जाधव, अमोल निंबाळकर, दयानंद गादेकर, बळीराम शिंदे, अशोक ढगारे, पुष्कर गांगळे, चापाह महबूब अरब व प्रकाश बोईनवाड यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

Tags: Highway robbery plot foiled; Seven innkeepers arrested by local crime branch
Previous Post

हे तर समाज बांधवांच्या लढ्याचं यश!

Next Post

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सेरेंटिका कंपनीची हेल्पलाईन

Related Posts

धाराशिव

आता चर्चा नाही, थेट कृती हवी,” 
रोडरोमियोवर कठोर कारवाई करावी,

March 2, 2026
धाराशिव

सेरेंटिका रिन्यूएबल्स कडून २२० के.व्ही. EHV वीजवाहिनीचे यशस्वीरित्या काम पूर्ण; चार्जिंग सुरू

February 15, 2026
धाराशिव

आदेश फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा, जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून राजकीय वॉर, सोशल मीडियावर रणधुमाळी

February 14, 2026
क्राईम

कळंब तालुक्यात अफू लागवड उघड, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 13, 2026
धाराशिव

आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव

January 26, 2026
धाराशिव

शेतवस्तीवर दहशत माजवणाऱ्या दरोडेखोर टोळीला बेड्या, ८ गुन्ह्यांचा भांडाफोड; २.०७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

January 11, 2026
Next Post

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सेरेंटिका कंपनीची हेल्पलाईन

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना (शिंदे गट) सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0

आता चर्चा नाही, थेट कृती हवी,” 
रोडरोमियोवर कठोर कारवाई करावी,

March 2, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्स कडून २२० के.व्ही. EHV वीजवाहिनीचे यशस्वीरित्या काम पूर्ण; चार्जिंग सुरू

February 15, 2026

आदेश फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा, जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून राजकीय वॉर, सोशल मीडियावर रणधुमाळी

February 14, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!