नगर पालिका निवडणुक आखाडा
कळंब
नगर पालिका निवडणुकीत राजकीय वातावरण तापू लागलं आहे. नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला आरक्षित असल्याने पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून या यादीत माजी नगराध्यक्षा मिराबाई चोंदे यांचाही समावेश असल्याने सगळ्यांचे लक्ष त्यांच्या पुढील निर्णयाकडे लागलं आहे.
कळंब नगर पालिका निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. महायूती आणि महाविकास आघाडीत उमेदवार निवडीवर अजूनही एकमत न झाल्यामुळे दोन्ही आघाड्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. प्रभागात काम केले, पक्षाशी निष्ठा राखली, नेतृत्वावर विश्वास ठेवला अशा दाव्यांसह अनेक इच्छुक कार्यकर्ते पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळवण्यासाठी सक्रिय झाले आहेत. मात्र प्रमुख नेत्यांनी नगरसेवक उमेदवारांचा सप्सेस आद्यापही कायम ठेवला आहे. त्यामुळे भावी उमेदवारांचे नेत्याच्या निर्णायकडे लक्ष लागून आहे.
नगरसेवक पदाच्या निवडणुकीतही मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे. एकूण २४ जणांनी ३४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली असून प्रमुख प्रभागांमध्ये भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि स्थानिक गटाचे उमेदवार उतरले आहेत. प्रभाग एकमध्ये अनंत वाघमारे, प्रभाग दोनमध्ये रोहन पारख, प्रभाग सहामध्ये पाडुरगं कुंभार आणि अर्चना मोरे, प्रभाग सातमध्ये अमरबीन चाऊस, प्रभाग आठमध्ये मुस्ताक खुरेशी आणि प्रभाग नऊमध्ये गजानन चोंदे यांचा समावेश आहे. मात्र पक्षांचे एबी फॉर्म मिळाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
नगराध्यक्ष पदासाठी पाच नामनिर्देशन पत्र..
सुनंदा शिवाजी कापसे, शेहनाज शेख, ज्योती सपाटे, मीराबाई चोंदे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. नगराध्यक्ष पद निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत दिले आहेत. अंतिम चित्र मात्र पक्षांचे एबी फॉर्म मिळाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
माजी नगराध्यक्षा मैदानात
या सर्व हालचालींमध्ये मिराबाई चोंदे यांनी नगराध्यपदासाठी दाखल केलेले नामनिर्देशन अर्ज राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्या प्रत्यक्ष निवडणूक लढवणार की नाही, याची उत्सुकता कायम आहे. कळंबच्या राजकारणात पुढील काही दिवसांत अनेक उलटफेर घडण्याची शक्यता असून रंगतदार निवडणुकीची चाहूल स्पष्टपणे जाणवू लागली आहे.










