लाखी गावात शेकडो कुटुंबांना किराणा किटचे वाटप
परंडा 
अलीकडील अतिवृष्टी आणि महापूर यामुळे लाखी गावातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असताना,  डिएजीए फौंडेशनने पूरग्रस्तांना माणुसकीचा मोठा आधार दिला असून परंडा तालुक्यातील लाखी गावातील पुरग्रस्त कुटुंबांना किराणा किटचे वाटप करण्यात आले आहे. 
  अतीवृष्टी व पुर परिस्थती मुळे परंडा तालुक्यातील लाखी येथील शेतातील पिके वाहून गेली, तसेच अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने साठवलेले अन्नधान्य खराब झाले होते. परिणामी, गावकऱ्यांसमोर अन्नधान्याची मोठी टंचाई निर्माण झाली होती. याच कठीण पार्श्वभूमीवर डिएजीए फौंडेशन मदतीसाठी देवदूतासारखे धावून आले. वाटप केलेल्या किराणा किटमध्ये तांदूळ, गहू, डाळी, साखर, तेल, चहा, मसाले, मीठ यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता. ही तातडीची मदत गावकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरली. सक्रिय सहभाग आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश किराणा वाटपाच्या या मदत उपक्रमात डिएजीए फौंडेशनचे सदस्य अत्यंत सक्रिय होते. विजय वाघमारे, सुनील थोरबोले, नागेश पाटील, आणि बालाजी देशमुख यांनी गावात जाऊन गरजू कुटुंबांपर्यंत ही मदत प्रत्यक्ष पोहोचवली. तसेच, गजानन तिवारी व कृषी अधिकारी कल्याण जाधव यांनीही या उपक्रमात सहभाग नोंदवला.
सामाजिक जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित केले. “आपत्तीच्या काळात शेजाऱ्याला मदत करणे हीच खरी माणुसकी आहे. पुढील काळातही आम्ही गरजूंपर्यंत मदत पोहोचवत राहू,” अशी ग्वाही त्यांनी दिली. गावकऱ्यांमध्ये दिलासा आणि सहकार्याचे वातावरण गावकऱ्यांनी या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “पुरामुळे काही दिवस चुली विझल्या होत्या,
या डिएजीए फौंडेशनच्या मदतीमुळे आमच्या घराघरांत पुन्हा स्वयंपाक सुरू होऊ शकला, अशी भावनिक प्रतिक्रिया अनेकांनी दिली. आशा आणि परस्पर सहकार्याचे सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा देणारे हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे.
			










