कळंब (प्रतिनिधी )
कळंब तालुक्यातील मौजे शेळका धानोरा येथील ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य अप्पासाहेब शेळके यांची काँग्रेसच्या कळंब तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांना उभारी मिळणार आहे
अप्पासाहेब शेळके हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षामधे कार्यरत असून त्यांनी . पक्षसंघटनेत विविध पदे भुषवीली आहेत . जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताना त्यांनी शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते विकास व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अप्पासाहेब शेळके यांच्या नेतृत्वामुळे तालुक्यातील काँग्रेस पक्ष अधिक बळकटी मिळेल व संघटनात्मक कामकाजाला नवी दिशा मिळेल.
पक्षश्रेष्ठींनीही शेळके यांच्या कामाचा गौरव करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. लवकरच त्यांच्या नेतृत्वाखाली संघटन मजबूत करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जाणार असल्याचेही समजते. काँग्रेस कार्यकर्ते, स्थानिक नागरिक व ग्रामस्थांनीही शेळके यांच्या निवडीचे स्वागत करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.











