चोऱ्यांचा सुळसुळाट, पोलिसांचा अंकुश संपला का?
कळंब
शहरातील बसस्थानकावर एक महिलचे 49 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, उघडपणे चोरीला गेले आहे, वारंवार बसस्थानकावर होणाऱ्या चोऱ्या मुळे नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
परवीन रसूल सय्यद (वय 37, रा. शिरसावाकडी, ता. परंडा, जि. धाराशिव, ह.मु. रूम नं. 33 ए, दुधगंगा बिल्डिंग, एसआरपीएफ ग्रुप 08, गोरेगाव पूर्व, मुंबई) या महिला दि. 28 ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे 2.30 वाजता कळंब बसस्थानकावर धाराशिवकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील 49 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, साधारण किंमत 1,99,110 रुपये किंमतीचे दागिने गर्दीचा फायदा घेत चोरून नेले. घटनेनंतर परवीन सय्यद यांनी कळंब पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी भा.दं.वि. कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. मात्र, यानंतरही शहरात गस्त वाढवणे किंवा नागरिकांच्या सुरक्षेची ठोस उपाययोजना करण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात घरफोड्या, दुचाकी चोरी, पर्स चोरी अशा घटनांचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे. पोलिसांकडून केवळ गुन्हा नोंदवणे एवढेच होत आहे.
पोलिसांनी सतत गस्त, चोरीच्या प्रकरणात तात्काळ तपास आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.











