कळंब:
डी. के. कुलकर्णी यांनी आयुष्यभर माणसे जोडण्याचे काम केले. लहान-थोर कुणीही स्वीकारावे असे त्यांचे नाते होते. नाते सांगणे वेगळे आणि जपणे वेगळे असते; त्यांनी नाते जपण्याचे काम शेवटपर्यंत केले. असे विचार शिक्षणतज्ज्ञ एम.डी. देशमुख यांनी व्यक्त केले.
कळंब येथील शुभमंगल कार्यालयात दिनांक ४ ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या ‘माणसातला माणूस डी.के. सर स्मृती ग्रंथाच्या’ (कै. दत्तात्रय कमलाकर कुलकर्णी) प्रथम पुण्यस्मरण प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. अण्णा महाराज कराड, रामराजे राक्षस भुवनकर, माजी प्राचार्य सूर्यकांत जगदाळे (वाशी), ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे महाराष्ट्र संघटक डॉ. बी.आर. पाटील (लातूर), डॉ. रामजीवन भांगडीया, आ.भा. सानेगुरुजी कथामालेचे प्रदेशाध्यक्ष सुनील पुजारी (सोलापूर), धाराशिव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश टेकाळे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग कुंभार, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज आडसुळ, प्रेमचंद देवसाळे (कुंथलगिरी), अनंत सूर्यवंशी (परांडा), आणि डी.डी. शेरे (परंडा) यांची उपस्थिती होती.
डी. के. कुलकर्णी यांना घर आणि समाज वेगळे नव्हते. प्रत्येक व्यक्तीशी त्यांना आपुलकी होती असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ एम.डी. देशमुख
कार्यक्रमाची सुरुवात डी.के. कुलकर्णी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत जयवंत कुलकर्णी (ईटकुरकर), वामन कुलकर्णी (ईटकुरकर), डॉ. गिरीष कुलकर्णी, विजयकुमार जोशी, शामराव व्यास आणि वेदांत कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमात ह.भ.प. अन्नदाते बंडोपंत दशरथ, सुभाष घोडके, प्रीतमयी प्रकाशाचे प्रितमय वेदपाठक आणि माधवसिंग राजपूत यांचा सत्कार करण्यात आला. स्वागत गीत सोपान पवार यांनी गायले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गिरीष कुलकर्णी यांनी केले, सूत्रसंचालन प्राचार्य महादेव गपाट यांनी केले, तर आभार वामन कुलकर्णी (ईटकुरकर) यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता महादेव महाराज आडसुळ यांच्या पसायदान गायनाने झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कौस्तुभ ईटकुरकर, सचिन बरगले, गोपाळ कुलकर्णी, प्रद्युम्न ईटकुरकर, माधव कुलकर्णी, संकर्षण इटकुरकर, गणेश शिंदे, नितीन यादव, किरण जोगदंड, श्रीमती अर्चना सरवदे, सुरज सातव आणि मच्छिंद्र बराटे यांनी परिश्रम घेतले.











