मांजरा तेरणा नदिवरील बॅरेजेसच्या तुंबलेल्या प्रस्तावास मजुरी दया
आमदार कैलास पाटील यांची विधानसभेत मागणी
कळंब. . . (प्रतिनीधी J
मांजरा तेरणा नदिवरील बॅरेजेसच्या तुंबलेल्या प्रस्तावास मजुरी दयामराठवाडा नदीजोड प्रकल्प करून हक्काचे पाणी देताना धाराशिव, लातूर व बीड जिल्ह्याचा हिस्सा ठरवून द्यावा अशी आग्रही मागणी आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात केली. याशिवाय मांजरा नदी पात्रातील बॅरेजेसच्या दप्तरदिरंगाईत तुंबलेल्या प्रस्तावास मंजूरी द्यावी अशी मागणी करून पुन्हा एकदा हा विषय सभापटलावर आणला.

आ. कैलास घाडगे पाटील यांनी मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यावर बोलताना आकांक्षीत अशा धाराशीव जिल्ह्यास यास न्याय्य स्थान असावे असा महत्त्वपूर्ण मुद्दा मांडला. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसंपदा विभाग काही करत आहे. विशेषतः त्यात मुख्यमंत्र्यांच्या नदीजोड या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा समावेश आहे.

गेल्यावेळी या नदीजोड प्रकल्पातुन मराठवाड्यासाठी १६७ टीएमसी पाणी देणार होते पण आताच्या अर्थसंकल्पात ते पाणी ५४.७० टीएमसी वर आलं आहे. असं असेल तरी यात धाराशिव, लातूर व बीड याबाबत पाणी वाटपाचा निश्चित उल्लेख दिसत नसल्याने त्याबाबतची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आ. पाटील यांनी केली. ज्यावेळी या प्रकल्पाचा प्रकल्प अहवाल तयार करायचा तेव्हा या तीनही जिल्ह्याचा त्यात समावेश करण्यात यावा अशीही त्यांनी मागणी केली.

पार गोदावरी प्रकल्पाचा अहवाल करण्यासाठी २०१४ साली सात कोटीची तरतूद केली होती. पण अद्याप तो पूर्ण झाला नाही आता त्यासाठी ५२ कोटींचा खर्च लागणार आहे. एकुणच मूळ मुद्दा हा विकास आराखडा वेळेत पूर्ण होणे आवश्यक असल्याने शासनाने कालमर्यादा निश्चित करणे अपेक्षित असल्याच मत आ. पाटील यांनी व्यक्त केल.

जायकवाडी ते मांजरा, तेरणा…
जायकवाडी धरणात व तेथून पुढे माजलगाव जलशायात हे पाणी येणं शक्य आहे. तिथून कुंडलिका धरणामध्ये व तेथून तांदुळवाडी प्रकल्पात ते पाणी सोडल जाऊ शकते. शेवटी हे पाणी मांजरा व तेरणा धरणात येऊ शकते, असा मुद्दा देखील आ. पाटील यांनी यावेळी मांडला.

बॅरेजेसचा विषय पुन्हा अजेंड्यावर…
मांजरा व तेरणा धरणावर कोल्हापूरी बंधारे आहेत पण सध्या त्याची मोठी दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे या बंधाऱ्याचे रूपांतर बॅरेजेस मध्ये करावे अशी मागणी आहे. तसा प्रस्ताव शासनदरबारी प्रलंबित आहे, तो मंजूर करावे अशी मागणी आ. कैलास पाटील यांनी केली आहे.