Sunday, July 13, 2025
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰सरूताईंच्या जात्यावरील ‘ओव्या’ अन् भुमिपुत्रांनी शब्दांत गुंफलेली ‘आभाळमाया’…    📰कळंब शहरात बुधवारी जिजाऊ रथ याञेचे आगमन    📰मराठवाड्याच हक्काच पाणी ; त्यात धाराशिवचे स्थान निश्चित करा    📰वन आणि वन्यजीव संवर्धनातील महत्त्वपूर्ण कार्यासाठी वन अधिकारी मंगेश मधुकर ताटे यांना महाराष्ट्र शासनाचे सुवर्ण पदक    📰धाराशिवमध्ये मराठा समाज आक्रमक; संतोष देशमुख खून प्रकरणी आरोपींना अटक करण्याची मागणी    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

वन आणि वन्यजीव संवर्धनातील महत्त्वपूर्ण कार्यासाठी वन अधिकारी मंगेश मधुकर ताटे यांना महाराष्ट्र शासनाचे सुवर्ण पदक

लोकाभिमान by लोकाभिमान
March 12, 2025
in महाराष्ट्र
A A
0
0
SHARES
8
VIEWS

मुंबई (प्रतिनीधी )
महाराष्ट्र शासनाने वन आणि वन्यजीव संवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी तासगाव, जिल्हा सातारा येथील वन अधिकारी मंगेश मधुकर ताटे यांना सुवर्ण पदक जाहीर केले आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात व्याघ्र संरक्षण, पर्यावरण व्यवस्थापन, आणि जैवविविधता संवर्धनासाठी भरीव कार्य केले आहे. विशेषत: पेंच व्याघ्र प्रकल्पातील त्यांचे योगदान उल्लेखनीय असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे व्याघ्र संरक्षणाच्या दिशेने महत्त्वाची पावले उचलली गेली आहेत.

मंगेश ताटे यांनी २०१६ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र वनसेवा परीक्षेत यश मिळवत वन परिक्षेत्र अधिकारी ( Range Forest Officer) म्हणून सेवेत प्रवेश केला. कुंडल वन अकादमीत नियुक्तीपूर्व प्रशिक्षण घेत असताना त्यांनी सुवर्ण पदक मिळवले होते. सेवा सुरू झाल्यानंतर त्यांनी पेंच व्याघ्र प्रकल्पात विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या वन परिक्षेत्र अधिकारी पदावर कार्यरत राहून अनेक महत्त्वाचे उपक्रम राबवले. तोतलाडोह जलाशयातील अवैध मासेमारीवर त्यांनी प्रभावी नियंत्रण मिळवले आणि आवश्यकतेनुसार कठोर कारवाई देखील केली.

पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पूर्व वन परिक्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी व्याघ्र संरक्षण आणि व्यवस्थापनासाठी विशेष धोरणे अमलात आणली. बदलत्या हवामानाच्या परिणामांच्या अनुषंगाने NAFCC प्रकल्पांतर्गत गाभा क्षेत्रा मधील खराब झालेल्या जंगलाचे पुनर्स्थापन केले. या कामाच्या अंतर्गत त्यांनी अनेक इमारती हटवून त्या जागी निसर्गस्नेही जंगल विकसित केले. त्यांच्या या अभिनव प्रकल्पाला SKOTCH पुरस्काराने गौरविण्यात आले.

व्याघ्रसंवर्धनाच्या क्षेत्रात त्यांनी घेतलेल्या पुढाकारांमुळे पेंच व्याघ्र प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय “CATS accreditation” मिळाले तसेच वाघांच्या वाढत्या संख्येसाठी “Tx2 अवॉर्ड” प्रदान करण्यात आला. याशिवाय Management Effective Evaluation (MEE) मध्ये पेंच व्याघ्र प्रकल्पाला देशात पहिल्या पाच प्रकल्पांमध्ये स्थान मिळाले.

त्यांनी व्याघ्र पुनर्वसनासोबतच अवनी वाघिणीच्या अनाथ छाव्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात पुनर्स्थापित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. तसेच त्यांनी सिल्लारी येथे निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध करून दिली.

पेंच व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्रसंख्या वाढवण्यासाठी, व्याघ्र अधिवास संरक्षणासाठी आणि मानव-वन्यजीव संघर्ष हाताळण्यासाठी त्यांनी अनेक प्रभावी उपाययोजना राबवल्या. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज या प्रकल्पात वाघांची संख्या ६० च्या घरात पोहोचली आहे.

त्यांच्या या कार्यात तत्कालीन क्षेत्र संचालक रविकिरण गोवेकर, ए. श्रीलक्ष्मी आणि डॉ. प्रभू नाथ शुक्ल यांचे मार्गदर्शन, तसेच सहायक वनसंरक्षक अतुल देवकर, किरण पाटील आणि गीता नन्नावरे यांचे सहकार्य मिळाले. वन विभागातील अनेक अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभल्यामुळेच हे यश शक्य झाले.

मंगेश ताटे यांनी वनसंवर्धन आणि व्याघ्र व्यवस्थापनाच्या क्षेत्रात केलेल्या अप्रतिम कार्यासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांना सुवर्ण पदकाने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगेश ताटे हे सध्या सहायक वनसंरक्षक, पुणे या पदावर आपली सेवा बजावत आहेत त्यांचा हा गौरव वन विभागातील नव्या पिढीच्या अधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

Previous Post

धाराशिवमध्ये मराठा समाज आक्रमक; संतोष देशमुख खून प्रकरणी आरोपींना अटक करण्याची मागणी

Next Post

मराठवाड्याच हक्काच पाणी ; त्यात धाराशिवचे स्थान निश्चित करा

Related Posts

महाराष्ट्र

शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा तेवत ठेवणारा महामेरू.

November 29, 2024
महाराष्ट्र

महाविकास आघाडीचा जागावाटपाचं कुठपर्यंत आलं? संजय राऊतांनी केलं सूचक विधान; म्हणाले….

October 22, 2024
Next Post

मराठवाड्याच हक्काच पाणी ; त्यात धाराशिवचे स्थान निश्चित करा

  • खा ओमराजे निंबाळकर आ कैलास पाटील यांच्या उपस्थीतीत मराठा चळवळीतील आंदोलक अभयसिंहराजे आडसुळ सह कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्रातील शिंदे फडणवीसांच आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार
    खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर  यांचा हल्लाबोल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाड्याच हक्काच पाणी ; त्यात धाराशिवचे स्थान निश्चित करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्यासाठी मतदारसंघ मंदिर तर जनता दैवत – आमदार कैलास पाटील

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये मराठा समाज आक्रमक; संतोष देशमुख खून प्रकरणी आरोपींना अटक करण्याची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0

सरूताईंच्या जात्यावरील ‘ओव्या’ अन् भुमिपुत्रांनी शब्दांत गुंफलेली ‘आभाळमाया’…

March 20, 2025

कळंब शहरात बुधवारी जिजाऊ रथ याञेचे आगमन

March 20, 2025

मराठवाड्याच हक्काच पाणी ; त्यात धाराशिवचे स्थान निश्चित करा

March 20, 2025
  • Home

© 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

© 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.