वाढदिवस विशेष
विश्वनाथ आण्णा तोडकर
.
महाराष्ट्राला सामाजिक बदलाचा,पुरोगामीत्वाचा वारसा आहे.समतेचा वारसा आहे.हा वारसा जपणारे महाराष्ट्रामध्ये अनेक ध्येयवेडे गुणवंत कार्यकर्ते या मायभूमीने महाराष्ट्राला दिलेले आहेत. बलिदानाची आणि सामाजिक बदलाची परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. अशा या महाराष्ट्राच्या मायभूमीमध्ये विश्वनाथ तोडकर अण्णा यांचा जन्म झाला.लहानपणी आर्थिक दुर्बलतेचे चटके गरिबी दारिद्र्य. स्वतः डोळ्यांनी न्याहाळलं.त्यांनी त्याचा अभ्यास केला.आणि मराठवाड्याच्या विकासासाठी झटलं पाहिजे म्हणून पुणे सोडलं.1985 ते 2024 या कार्यकालातील सामाजिक बदलाच्या वाटसरू पैकी एक नाव घेतल्याशिवाय इतिहासाचे पान लिहिलं जानार नाही.त्यातिल व्यक्ती म्हणजे विश्वनाथ शिवमूर्ती तोडकर.पूर्ण महाराष्ट्र अण्णा या नावाने ओळखतो.अण्णा म्हणजे कर्ता बाप,मायेची सावली, सामाजिक कार्यकर्त्यांचे ऊर्जा स्त्रोत,विचाराचं भांडार,आणि सामाजिक कार्यकर्ता घडवणारी सोन्याची भट्टी असं म्हणायला बिलकुल वावगं वाटणार नाही.कारण चार दशकामध्ये किमान दोन ते तिन हजार सामाजिक कार्यकर्ते निर्माण करणे. कार्यकर्त्याची जडणघडण करणे.प्रशिक्षणाचे आयोजन करून त्यांच्यात सामाजिक ऊर्जा कार्याची ऊर्जा निर्माण करणे.सामाजिक कार्यामध्ये त्यांना सक्रिय करणे.असे अनेक कार्यकर्ते पश्चिम महाराष्ट्र,विदर्भ, कोकण,मराठवाडा,उत्तर महाराष्ट्रामध्ये निर्माण केले.अण्णा त्यांच्या पाठीशी उभा राहत असताना सामाजिक कार्याला निधीची उभारणी करणे.सामाजिक संस्थांचे रजिस्ट्रेशन पासून ते त्यांना निधी मिळे पर्यंत मार्गदर्शन करणे.आधार देणे.पाठबळ देणे.अशा विविध पटलावरती जणू विठ्ठलाच्या रूपात सगळ्यांचा पाठीराखा म्हणून तोडकर अण्णांचं नाव आहे..
अण्णांचा एकसष्ठी जन्मोत्सव साजरा करताना मी स्वतः धन्य झालो आहे. गेली 35 वर्ष नियमित सहवासात राहून. माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना घडविण्याचं कार्य तोडकर अण्णा याणी केलं आहे.प्रत्येक कार्यकर्त्यांना सामाजिक बदलाचं बळ दिलं.सामान्य कार्यकर्त्यांना उभा करण्यामध्ये तोडकर अण्णा यांचे नाव पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे.
मित्रांनो,मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये महिला राज्यसत्ता आंदोलन,मराठवाडा लोकविकास मंच ते महाराष्ट्र लोकविकास मंच, गायरान प्रश्न घेऊन,मानवी हक्काचा आवाज,विधवा परीतक्ता महिलांचे प्रश्न, अनाथ मुलांचे प्रश्न, दुष्काळ,पाणी,रोजगार, असे विविध प्रश्न घेऊन सामाजिक बदलाची चळवळ आणि संस्थांचे संघटन करणारा एक महामेरू.पर्याय संस्थेच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यामध्ये सामाजिक आर्थिक बदलासाठी नाहीरे यांचा आवाज बुलंद करणारे नेतृत्व म्हणजे तोडकर अण्णा होय.गेल्या 45 वर्षांत महाराष्ट्रामध्ये पथनाट्य,सभा,मेळावे, मीटिंग,मोर्चे आंदोलने काढणारा एक लढवय्या क्रांतीकारक म्हणून महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहतो आहे.
जेव्हा महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडतो,उपासमारी होते,भूकंप होतो,कोविड होतो.जी जी संकटे महाराष्ट्रामध्ये आली त्या संकटाचा समर्थपणे सामना करणारा एक वीर योद्धा त्यांनी कार्य केलं आहे. कोविड19 मधला एक अनुभव सांगताना.स्वतः हा निर्माण केलेलं 50 क्विंटल धाण्याचं खळं जागेवरती खाली केलं.उपासपोटी फिरणाऱ्या धनगर समाजातल्या लोकांना ते वाटून टाकलं.1993 साली झालेल्या भूकंपामध्ये किल्लारी,आणि उधाराशिव जिल्ह्यामध्ये जीवाची बाजी लावून अनेकांना पोसण्याचं काम त्यांनी केलं.भूकंपग्रस्तांचे प्रश्न शासन दरबारी मांडले कोविडमध्ये हजारो माणसांना वाचवण्यासाठी मदतीचे स्त्रोत उभा केले.
कळंब येथील पर्याय संस्थेचे प्रशिक्षण सेंटर म्हणजे कार्यकर्ता निर्माण करणारी खान होय.शिव शाहू फुले आंबेडकरांचा वारसा आणि विचाराची प्रत्यक्षात कृती करणारे माझे धर्मगुरू विश्वनाथ तोडकर अण्णा यांचा 61 वा जन्मदिवस सादर करताना मी धन्य झालो.
त्यांना उदंड आयुष्य लाभो यासाठी निसर्गातल्या सर्व शक्तींना मी प्रार्थना करतो.
आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो…..
(लेखक भुमीपुत्र वाघ )