दोन काव्य संग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
कळंब – अशिक्षित पण जीवनाचं सार व्यक्त करणारी शब्द प्रतिभा म्हणजे जात्यावरील ओवी. अशाच कवयीत्री सरुबाई डोके यांच्या ‘जात्यावरील ओव्या’ अन् भूमिपुत्र वाघ यांच्या ‘आभाळमाया’ या काव्यसंग्रहाचे रविवारी प्रकाशन होणार आहे.

हसेगाव केज ता कळंब येथील पर्याय सामाजीक संस्थेच्या कॅम्पसमध्ये सायंकाळी पाच वाजता हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यास राज्यभरातील सामाजीक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारी मंडळी उपस्थित राहणार आहे.

प्रेम,माया,वात्सल्य, शेती, पाणी,नाती,गोती अशा विषयाच्या अनुषंगाने काव्य संग्रहातील कवितेचा परामर्श घेणाऱ्या ग्रामीण भागातील नात्या गोत्यांच महत्त्व सांगणाऱ्या या ओव्या आणि कविता संग्रहातील कविता आपल्या ग्रामीण भागातील माणसांच्या मनावरती नक्की प्रतिबिंबित होतील असा आशीवाद आहे.
या कार्यक्रमाला पर्याय संस्थेचे कार्यवाहक विश्वनाथ तोडकर, प्राचार्य व्यंकट अनिगुंठे , रमाकांत कुलकर्णी, एम एन कोंढाळकर, प्राचार्य अशोक मोहेकर, भास्कर चंदनशिव, प्राचार्य गोविंद बिराजदार,अशोक शिंदे,अमर चौंदे,परमेश्वर पालकर,बालाजी अडसूळ,प्रा.बाळकृष्ण भवर,पत्रकार सतीश टोणगे, सुभाष घोडके अशा विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कळंब या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत आहे.

परिसरातील कथाकार, कवी यांना खास निमंत्रित करण्यात आले असून काव्य संमेलनाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.