कळंब
पावसामुळे सर्वत्र नुकसान झाले आहे. नद्यांना पुर आल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात असून नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. नदीकाठच्या अनेक गावांना सतर्कतेचा इशारा तहसीलदार हेमंत ढोकले यांनी दिला आहे.
सप्टेंबर महिन्यात पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्यामुळे भितीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून आता नद्यांचे पाणी गावात शिरू लागले आहे. त्यामुळे नदीकाठची गावे असुरक्षित वाटू लागली आहेत. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मांजरा, वाशिरा, तेर, ढोरी आणि मुरुडा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
नदीकाठील सर्व गावांतील नागरिकांनी नदीपात्राजवळील जनावरे आणि साहित्य तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावे. नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये. पुलावरून पाणी वाहत असताना कोणत्याही व्यक्तीने पायी किंवा वाहनासह पुल ओलांडू नये. नदीकिनारी ज्या भागात पाणी शिरण्याची किंवा वेढा देण्याची शक्यता आहे, त्या भागातील नागरिकांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.
“सतर्क राहा, सुरक्षित राहा आणि पावसाळ्यातील सुरक्षिततेचे नियम पाळा”, असे आवाहन तहसीलदार हेमंत ढोकले यांनी केले आहे.
—
📞 तालुका आपत्ती नियंत्रण कक्ष क्रमांक
02473-262254
👥 संपर्क अधिकारी
1. हेमंत ढोकले, तहसीलदार – 9881745577
2. गोपाला तापडीया, नायब तहसीलदार – 9527281965
3. संतोष कन्हाळे, मंडळ सहाय्यक – 7875172475











