कळंब (लोकाभिमान विशेष)
कळंब नगरपालिकेच्या येऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीच मतदार याद्यांमध्ये मोठा गोंधळ उडाल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत तब्बल २११ मतदारांना नोटीस बजावण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेक मतदारांचे नाव चुकीच्या प्रभागात नोंदवले गेल्याने मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
  मतदारांचे वास्तव्य, प्रभागांचे सीमांकन आणि नोंदी या निवडणुकीतील महत्त्वाच्या बाबी असूनही, प्रशासनाने यामध्ये गंभीर दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. काहींची नावे मूळ प्रभागातून वगळली गेली आहेत, तर काहींची नावे दोन ठिकाणी दिसत असल्याने यादीच्या पारदर्शकतेवर शंका उपस्थित होत आहे.
या प्रभागांतील मतदारांना नोटीस
नगरपालिकेने प्रामुख्याने प्रभाग क्रमांक १, २, ३ आणि १० मधील मतदारांना नोटिसा बजावून त्यांच्या वास्तव्याचे व नाव नोंदीचे स्पष्टीकरण मागवले आहे. प्रभाग क्रमांक मधून नाव वगळून प्रभाग क्रमांक मध्ये समाविष्ट करावे अशा स्वरूपाच्या हरकती प्रशासनाकडे दाखल झाल्या आहेत.
नागरिकांचा संताप.. 
या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर २४ ऑक्टोबर रोजी नागरिकांनी पालिका कार्यालयात हजेरी लावून आपले म्हणणे मांडले.   मतदार यादीत इतका गोंधळ कसा होऊ शकतो? हा मतदानाचा हक्क वंचित ठेवण्याचा प्रयत्न आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत काही नागरिकांनी थेट जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
पालिक प्रशासनाचा निर्णय.
२११ मतदारांना पालिका प्रशासनाने नोटीस पाठवली असून अनेकांनी म्हणणे सादर केले आहेत. त्यामुळे आता पालिका प्रशासनन यावर काय निर्णय घेते याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे.
			










