कळंब :
तालुक्यातील ईटकूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या 2005 सालच्या 10वीच्या विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी कार्याचा आदर्श घालून दिला आहे. या वर्गमित्रांनी एकत्र येऊन समाजातील गरजू घटकांना मदत करण्याचा उपक्रम राबवला. ग्रुपच्या माध्यमातून निधी जमा करून त्यांनी पूरग्रस्त, आत्महत्याग्रस्त आणि निराधार कुटुंबांना एकूण ₹21,500 ची आर्थिक मदत दिली.
या मदतीत पूरग्रस्त कुटुंबातील अंजली मधुकर आडसूळ यांना ₹7,500, निराधार मुलींसाठी कार्यरत असलेल्या स्वआधार मुलींचे वसतिगृह, धाराशिव (तुळजाई प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्था) यांना ₹7,000 आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबातील श्वेता शरद गंभीर (रा. कारी, ता. धाराशिव) यांना ₹7,000 अशी मदत करण्यात आली.
या ग्रुपमध्ये 100 पेक्षा जास्त सदस्य असून ते नियमितपणे समाजोपयोगी उपक्रम हाती घेतात. यापूर्वीही त्यांनी शाळेच्या विकासकामात आणि सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
या वेळी अमोल कांबळे, मल्हारी गायके, संदीप लंगडे, सत्यदेव जगताप, सूरज शिंदे, विजय अडसूळ, संदेश रणदिवे, मारुती गायके, रितेश लगाडे, गणेश अडसूळ, अजित अडसूळ, जीवन गंभिरे आदी उपस्थित होते.
वर्गमित्रांच्या या संवेदनशील आणि समाजाभिमुख उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून तरुण पिढीसाठी तो प्रेरणादायी ठरत आहे.
			










