कळंब
शेतकऱ्यांची अवस्था भीषण झाली आहे. अतिवृष्टीने शेत उद्ध्वस्त, घरे वाहून गेली, जनावरे दगावली, संसार उघड्यावर आला. आणि या सर्वावर फडणवीस सरकारचं उत्तर काय? आकड्यांचा खेळ आणि पोकळ पॅकेज या फसवणुकीचा संताप उसळला आणि तहसिल कार्यालयावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) शेतकऱ्यांचा हंबरडा धरणे आंदोलन केले. 
शेतकऱ्यांचा हंबरडा अन्यायाविरुद्ध लढा  या घोषवाक्याखाली तहसिल कार्यालयावर हजारो शेतकरी आणि शिवसैनिकांनी हजेरी लावली. शेतकऱ्यांना न्याय द्या नाहीतर गादी सोडा, खोटं पॅकेज नको, खरा दिलासा द्या अशा घोषणांनी संपूर्ण परिसर हादरून गेला.
 सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने कळंब तालुक्यात हाहाकार माजवला. शेतकऱ्यांच्या शेतात पिकाचा एक दाणाही शिल्लक नाही. जमिनी उध्वस्त झाल्या, जनावरे वाहून गेली, घरे पाण्यात गेली. पण सरकारला यात शेतकऱ्यांचं दु:ख दिसत नाही. उलट पॅकेजच्या नावाखाली आकडे फेकून जनतेची थट्टा केली जात आहे.
    या संतप्त परिस्थितीत शिवसेनेचे तालुका प्रमुख सचिन काळे यांच्या नेतृत्वाखाली सरकारविरोधात रणसंग्राम छेडण्यात आला. 
यावेळी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्याला ५० हजार रुपयांची तात्काळ मदत मिळालीच पाहिजे, पीकविमा तत्काळ मंजूर करून निकष बदललेच पाहिजेत, या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. 
  यावेळी निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख सचिन काळे, प्रा. संजय कांबळे, युवासेना जिल्हाप्रमुख मनोहर धोंगडे, युवासेना तालुका प्रमुख पंडित देशमुख, कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक भारत सांगळे उपजिल्हाप्रमुख प्रदीप मेटे, शहर प्रमुख विश्वजीत जाधव. प्रा. दिलीप पाटील, सागर बाराते, संदीप पालकर, प्रतिक गायकवाड, अभयसिंह अडसूळ,अमृत जाधव, अक्षय बाराते, मालोजी पाटील, गोकुळ देशमुख, आबासाहेब मुळीक, वैभव जाधव, शशिकांत पाटील, नेताजी जावळे, ओंकार बांगर, नितीन चौधरी, प्रदीप गायकवाड, राजाभाऊ आगरकर, अभिनंदन मते, सचिन हिरे, किरण लोमटे प्रशांत धोंगडे, विठ्ठल समुद्रे, आश्रुबा बिक्कड, अशोक आव्हाड, सुधाकर टेळे, प्रदीप फरताडे, चरण पाटील, समाधान बाराते, प्रज्योत माने, सयाजी साळुंके, बिभीषण देशमुख, संजय भोसले, बिभीषण गायकवाड, बाळासाहेब काळे, लक्ष्मण रितापुरे, राहुल पाटील, नदीम मुलाणी, रामेश्वर जमाले, बंडू यादव अफसर पठाण, सचिन कापसे, किसन भिसे, यांच्यासह शिवसेनेचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
			










