कळंब
कळंब तालुका शिक्षक सहकारी पतसंस्था ही १०० कोटींपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल असलेली जिल्ह्यातील एकमेव पतसंस्था आहे, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी केले.
संस्थेची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा तांबारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ टकले, जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल माने, साने गुरुजी पतसंस्था परंडा चे अध्यक्ष ज्ञानेश्वर देवराम, कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षक पतसंस्था वाशीचे अध्यक्ष राजेश ढेंगळे, शिक्षण विस्तार अधिकारी सुशील फुलारी, मधुकर तोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या सभेत बोलताना तांबारे म्हणाले की, संस्थेचा १५ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला आहे. राज्यात लौकिक मिळवलेल्या या पतसंस्थेच्या प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत आहे. जिल्ह्यातील एकमेव १०० कोटी उलाढाल करणारी पतसंस्था म्हणून इतर ठिकाणचे पदाधिकारी येथे येऊन कारभाराचा अभ्यास करतात. सभासदांना ८.५ टक्के व्याजदराने २५ लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. मुदत ठेवीवर ८.५ टक्के व कायम ठेवीवर ८ टक्के व्याज देणारी ही राज्यातील एकमेव संस्था आहे. तसेच १५ टक्के लाभांश देणारीही ही राज्यातील पहिलीच पतसंस्था असल्याचे त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे सभासदांच्या हितासाठी संस्था गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, मुलीच्या विवाहासाठी ११ हजार रुपयांचे कन्यादान, सभासदाच्या मृत्यूवर कर्जमाफी, नफ्यातून भेटवस्तू वाटप, गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबवते.
या प्रसंगी जिल्हा सोसायटीचे उपाध्यक्ष कांतीलाल ढोले, संचालक हनुमंत पडवळ, प्रदीप म्हेत्रे, संजीवन तांबे, प्रशांत घुटे, नितीन गायकवाड, आप्पासाहेब भोंग, महादेव खराटे, महादेव मेनकुदळे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष बी. एन. जाधवर, संचालक भक्तराज दिवाने, दत्तात्रय पवार, दत्तात्रय सुरेवाड, भूषण नानजकर, गणेश कोठावळे, अशोक डिकले, दीपक चाळक, सुनील बोरकर, रामचंद्र पवार, रवींद्र शिनगारे, वैशाली शिरसागर, ज्योती ढेपे, कालींदा मुंडे यांनी परिश्रम घेतले. सचिव संतोष ठोंबरे यांनी अहवाल वाचन केले, तर आभार प्रदर्शन भक्तराज दिवाने यांनी केले.
यांचा झाला सन्मान
अशोक खडके यांचा सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल व मधुकर तोडकर यांची उपशिक्षणाधिकारी म्हणून झालेली निवड याबद्दल सपत्नी सत्कार करण्यात आला,
गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता ५ वीतील युवराज पांचाळ, सिद्धी जगताप, ईश्वरी गायकवाड, समर्थ जावळे, अक्षय गिरी, वेदांत भिसे, शौर्य रणदिवे, अभिनव गिरी, विराज गादेकर, रणवीर मचाले तसेच इयत्ता ८ वीतील सायली गायकवाड, ऋषिकेश क्षीरसागर, श्रेयस गिलबिले, साईराज भिसे, राज अनपट, तनिष्का माने, मृणाल पवळ, प्रांजल देशमुख, आदित्य कासले, भक्ती गरड, गार्गी जाधव, नक्षत्रा जावळे, श्रद्धा अनपट, वेदांत शिंदे या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, रोख पारितोषिक आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.











