कळंब
श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज जन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिर देवस्थान करीता सागवानी लाकडाचे एक आकर्षक सिंहासन तसेच मृदुंग–पखवाजसाठी दोन सुंदर पकवाज घोड्या अर्पण केल्या आहेत.
कळंब शहरातील वैजनाथ भडंगे यांचे मेहुणे डॉ. उमाकांत लांडगे पाटील (रा. बनबस, ता. जि. परभणी) यांनी श्री मन्मथ सिंहासन तसेच मृदुंग–पखवाजसाठी दोन सुंदर घोड्या भक्तिभावाने अर्पण केल्या. या सिंहासनाचे पुजन लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
मंदिर देवस्थानच्या वतीने डॉ. लांडगे पाटील यांचा श्री मन्मथ माऊलींच्या प्रतिमेने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
या वेळी प्रमुख उपस्थितीत लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र मुंडे, मंदिर देवस्थान सेवाभावी संस्था पंचकमिटी अध्यक्ष सागर मुंडे, लक्ष्मण फल्ले, सतीश शिंगणापूरे, मच्छिंद्र साखरे, विश्वेश्वर शिंगणापुरे, सोमनाथ कोल्हेकर, जगन्नाथ भोरे, संजय मुंडे, वैजनाथ भडंगे, दिलीप मोदी, परशुराम माळी, गणेश स्वामी, अथर्व मुंडे, रुद्र शिंगणापूर, राजवीर लोखंडे यांच्यासह अनेक भक्तगण उपस्थित होते.










