मध्यरात्री महामार्गावर गाड्या अडवून दरोडा टाकणाऱ्या अंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश
धाराशिव
मध्यरात्रीचा काळोख, रस्त्यावर शांतता… आणि अचानक एक गाडी थांबते! जॅक टाकून गाडी बंद पडते… प्रवासी घाबरतात… आणि सुरू होतो दरोड्याचा खेळ सुरू व्हायचा, राष्ट्रीय महामार्गावर जॅक टाकून दरोडा टाकणाऱ्या अंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश पोलीसांनी केला आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून राष्ट्रीय महामार्गावर प्रवाश्यांच्या गाड्या अडवून लुटणाऱ्या टोळीने जनतेच्या मनात भीती निर्माण केली होती, दिनांक १६ ऑक्टोबर रोजी उमरग्याकडून सोलापूरकडे जाणाऱ्या डॉक्टरच्या कुटुंबावर दरोडा टाकण्यात आला होता. प्रकरणी मुरूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक रीतु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद ईज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली तपासाला गती देण्यात आली.
धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने या टोळीला पकडण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लावली होती. अखेर पोलिसांच्या हाती दरोडेखोर लागले आहेत. कारवाईमुळे राष्ट्रीय महामार्गावरचा दहशतवाद संपला असून, जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे..
गुन्हेगार गजाआड..
पोलिसांनी अर्जुन बालाजी शिंदे आणि आशोक हिरामन शिंदे यांना अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी मुरूम आणि जळगाव जिल्ह्यातील दरोड्यांची कबुली दिली. गुन्ह्यात वापरलेली XUV500 गाडी, जॅक आणि चाळीसगावमधील ट्रक जप्त करण्यात आले.
तपासाची थरारक कहाणी..
तांत्रिक माहिती, पारंपरिक तपासपद्धती, आणि पोलिसांची चतुर रणनीती या सगळ्यांचा मेळ घालून आरोपींचा माग काढण्यात आला. एकेक पुरावा जोडत, पोलिसांनी गुन्हेगारांपर्यंत पोहोचून त्यांना गजाआड केले.
हीरो कोण…
या धाडसी कारवाईत पोलीस अधीक्षक श्रीमती रीतु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक विनोद ईज्जपवार, गुन्हे शाखा धाराशिव, सुदर्शन कासार स.पो.नि., पोलीस अंमलदार शौकत पठाण, पोलीस अंमलदार प्रकाश औताडे, पोलीस अंमलदार जावेद काझी, महीला पोलीस अंमलदार शोभा बांगर, पोलीस अंमलदार फरहान पठाण, पोलीस अंमलदार राठोड, चालक पोलीस अंमलदार सुभाष चौरे, चालक पोलीस अंमलदार प्रकाश बोईनवाड, चालक पोलीस अंमलदार रत्नदीप डोंगरे, चालक पोलीस अंमलदार नागनाथ गुरव, सदरील कामगीरी बजावली, यामध्ये QRT आणि RCP पथकाने निर्णायक भूमिका बजावली.











