अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध
कळंब
नगर पालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये प्रचंड गोंधळ झाला होता. आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या झडल्या होत्या, कर्मचाऱ्यावर प्रशासन व राजकीय मंडळींचा प्रचंड दबाव आला होता,
अखेर अंतिम मतदार याद्यांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे आता या मतदार याद्यांमध्ये कोणाला फायदा आणा तोटा पुढील काळात समजणार आहे.
कळंब नगर पालिका राजकीय घडामोडी करीता गाजलेली नप आहे. त्यामुळे याकडे राजकीय वर्तुळात या पालिकेला विशेष महत्व आहे. मालामाल समजल्या जाणाऱ्या नगर पालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी सर्व नेते सरसावले आहेत. आरक्षण आणि प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर, ८ ऑक्टोबर रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या. याद्यांमध्ये प्रचंड गोंधळ झाल्यामुळे राजकीय मंडळींनी प्रचंड विरोध केला होता. त्यामुळे पालिका प्रशासनाने गांभीर्याने घेत नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्थळ पाहणीसह आवश्यक सुधारणा केल्यानंतर अंतिम याद्या निश्चित करण्यात आल्या आहेत.
अंतिम मतदार याद्या
अंतिम मतदार याद्यांमध्ये शहरातील दहा प्रभागांमध्ये मतदारसंख्येत काही प्रमाणात बदल झाला असून एकूण २०,९५८ मतदार आगामी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
चौकट:
असे असणार मतदान
प्रभाग क्रमांक मतदारसंख्या
प्रभाग क्रमांक १- १६५४ मतदार
प्रभाग क्रमांक २- २४४८ मतदार
प्रभाग क्रमांक ३- २२०२ मतदार
प्रभाग क्रमांक ४- १९५४ मतदार
प्रभाग क्रमांक ५ – २११९ मतदार
प्रभाग क्रमांक ६- १६२७ मतदार
प्रभाग क्रमांक ७- २५१७ मतदार
प्रभाग क्रमांक ८- २४९१ मतदार
प्रभाग क्रमांक ९- २०८४ मतदार
प्रभाग क्रमांक १० – १८३६ मतदार
एकूण मतदारसंख्या: २०,९५८ मतदार











