कळंब
कळंब येथील पंचायत समिती सभागृहात लोक जनशक्ती पार्टीतर्फे झालेल्या गायरान हक्क परिषदेने प्रशासनाला ठणकावून इशारा देण्यात आले आहे. गायरान जमिनींच्या हक्कासाठी लढा आता निर्णायक टप्प्यात आहे. जमीन नावावर मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.
गायरान हक्क परिषदेचे आयोजन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. या वेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीस महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक सुनील बन्सी गायकवाड यांनी केले. या परिषद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेश वाहुळे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून लोक जनशक्ती पार्टीचे महासचिव प्रा.अशोक गायकवाड हे होते.
या परिषदेला जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड प्रतिसाद मिळाला. अध्यक्षस्थानी राजेश वाहुळे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पार्टीचे महासचिव प्रा. अशोक गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, सरकारने दुर्लक्ष केले तर आम्ही रस्त्यावर उतरण्यास तयार आहोत. गायरान धारकांच्या अडचणी थेट केंद्रापर्यंत नेऊ अशी घोषणा करण्यात आली.
या परिषदेतील विविध ठराव मंजूर करण्यात आले आहेत.
कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड यांचा वाढदिवस साजरा करून त्यांचा सत्कार करण्यात आला. या परिषदेसाठी लोक जनशक्ती पार्टीचे महासचिव अशोक गायकवाड, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष राजेश वाहुळे, केज तालुकाध्यक्ष गंगाधर पौळ, अंबाजोगाई शहराध्यक्ष अशोक काळे, प्रदीप गुंडरे, कळंब तालुकाध्यक्ष भारत कदम, शहराध्यक्ष नागेश धिरे, मुकेश गायकवाड, सुशांत गायकवाड, नटराज गायकवाड, बाबासाहेब टोपे, सचिन तीरकर, सतपाल बचुटे, बळीराम धैर्य, बाबासाहेब ओव्हाळ,दीपक हौसलमल,फिरोज पटेल, अखलाख काझी, प्रवीण गायकवाड,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखा चंदनशिवे, तालुका अध्यक्ष चांदणी सावंत, शिल्पा वाघमारे, सारिका साळवे,सुलभा गायकवाड उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली गायकवाड यांनी केले तर आभार नागेश धीरे यांनी मानले. या परिषदेसाठी कळंब तालुक्यातील गायरान धारक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.











