कळंब (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कळंब तालुका कार्याध्यक्षपदी नितीन सुरेशराव हारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मागील निवडणुकीत नितीन हारकर हे काही मोजक्या मतांनी पराभूत झाले होते, त्यानंतर सुध्दा त्यांनी समाज कार्यात अग्रेसर राहुन वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहे. या संघटन कौशल्य, कार्यतत्परता आणि पक्षनिष्ठेची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कळंब तालुका कार्याध्यक्षपदी नितीन सुरेशराव हारकर यांची नियुक्ती करुन पक्षाने ही जबाबदारी दिली आहे. आगामी नगर पालिका निवडणुकीत हारकर यांचा पक्षाला चांगला फायदा होणार आहे. या प्रसंगी त्यांना नियुक्तीपत्र राज्याचे कृषिमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे संपर्कमंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या स्वाक्षरी चे हे पत्र आहे. यावेळी तालुकाध्यक्ष शिवाजी लकडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन जबाबदारीनंतर हारकर यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. पक्षातील सर्व स्तरांवरून त्यांचे अभिनंदन होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.











