कळंब 
नगरपालिकेनंतर आता पंचायत समिती आरक्षण सोडतीने तालुक्यातील राजकीय चित्रच पालटले आहे. पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या या सोडतीत १६ गणांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. चिठ्ठी पद्धतीने झालेल्या सोडतीसाठी उपविभागीय अधिकारी संजय पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत ढोकले आणि गटविकास अधिकारी विनोद जाधव उपस्थित होते.
या सोडतीनंतर अनेक प्रस्थापित नेत्यांचे गणित पूर्णपणे बिघडले आहे. काही गणांमध्ये महिलांसाठी आरक्षण लागू झाल्याने विद्यमान पदाधिकारी व इच्छुकांना मोठा धक्का बसला आहे. तर काही ठिकाणी सर्वसाधारण आरक्षण झाल्याने नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे.
  आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या आरक्षण सोडतीनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. संभाव्य उमेदवारांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. काही ठिकाणी गटबाजी आणि नाराजीची चिन्हं स्पष्ट दिसत आहेत. नगरपालिकेच्या सोडतीप्रमाणेच पंचायत समिती सोडतीनेही तालुक्यातील राजकारणात नवे समीकरण निर्माण होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
ईटकुर – ना.मा.प्र.
मस्सा (खं) – सर्वसाधारण
मंगरुळ – सर्वसाधारण महिला
हासेगाव (केज)- ना.मा.प्र.महिला
डिकसळ – सर्वसाधारण
लोहटा (पुर्व) – अनु. जाती महिला
शिराढोण – ना.मा.प्र.
जवळा (खुर्द) – सर्वसाधारण
नायगांव – सर्वसाधारण महिला
रांजणी – सर्वसाधारण महिला
खामसवाडी – सर्वसाधारण
देवळाली – अनु.जाती
मोहा – ना.मा.प्र.महिला
गौर – सर्वसाधारण
येरमाळा – सर्वसाधारण महिला
चोराखळी – अनु. जाती महिला
			










